'टाइगर' बनणार 'बब्बर शेर', कबीर खानच्या सिनेमात सलमान खानची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:23 PM2024-01-03T18:23:29+5:302024-01-03T18:24:01+5:30

Salman Khan And Kabir Khan : सलमान खानसोबत 'बब्बर शेर' बनवण्याची योजना दिग्दर्शक कबीर खान आखत असल्याची माहिती मिळाली आहे.

'Tiger' will become 'Babbar Sher', Salman Khan's entry in Kabir Khan's film | 'टाइगर' बनणार 'बब्बर शेर', कबीर खानच्या सिनेमात सलमान खानची एन्ट्री

'टाइगर' बनणार 'बब्बर शेर', कबीर खानच्या सिनेमात सलमान खानची एन्ट्री

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)सोबत 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' सारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) त्याचा आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडे, चंदू चॅम्पियनचे शूटिंग संपण्यापूर्वी, तो त्याच्या आणखी एका चित्रपटाने प्रसिद्धीझोतात आला, ज्याचे नाव आहे बब्बर शेर (Babbar Sher Movie). आता या चित्रपटाशी सलमान खानचे नाव जोडले जात आहे. कबीर खानला त्याच्या बब्बर शेर या चित्रपटासाठी सलमान खान योग्य वाटतो आहे.

सध्या कबीर खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत चंदू चॅम्पियन या चित्रपटात काम करत आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दरम्यान, कबीर खानने त्याच्या पुढील चित्रपट बब्बर शेरसाठी सलमान खान योग्य वाटतो आहे. सध्या याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही, मात्र कबीर खान सलमान खानला त्याच्या चित्रपटात कास्ट करू इच्छित असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी सलमान खान देखील या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या महिन्याच्या अखेरीस चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

शूर माणसाची कथा 'बब्बर शेर'मध्ये

कबीर खानने शेवटचे सलमान खानसोबत ट्यूबलाइट हा चित्रपट केला होता, जो फ्लॉप ठरला होता. जर सलमानने बब्बर शेरमध्ये काम केले तर हा त्यांचा एकत्र चौथा चित्रपट असेल. बब्बर शेर ही एका शूर माणसाची कथा आहे. कबीर खानने फिल्म इंडस्ट्रीला 'एक था टायगर', 'काबुल एक्सप्रेस', 'न्यूयॉर्क', '८३' तसेच 'बजरंगी भाईजान' सारखे चित्रपट दिले आहेत. यानंतर चंदू चॅम्पियनच्या रिलीजसोबतच त्याने त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टचीही तयारी सुरू केली आहे.

Web Title: 'Tiger' will become 'Babbar Sher', Salman Khan's entry in Kabir Khan's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.