​सुशांत सिंग रजपूत करणार एकता कपूर आणि अभिषेक कपूरच्या चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 18:31 IST2017-03-20T13:01:20+5:302017-03-20T18:31:20+5:30

सुशांत सिंग रजपूतने बालाजी टेलिफ्लिम्सच्या पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी ...

Sushant Singh Rajput will work in Ekta Kapoor and Abhishek Kapoor's film | ​सुशांत सिंग रजपूत करणार एकता कपूर आणि अभिषेक कपूरच्या चित्रपटात काम

​सुशांत सिंग रजपूत करणार एकता कपूर आणि अभिषेक कपूरच्या चित्रपटात काम

शांत सिंग रजपूतने बालाजी टेलिफ्लिम्सच्या पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच या मालिकेतील त्याच्या आणि अंकिता लोखंडेच्या जोडीचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकेद्वारे  एकता कपूरने त्याला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक दिला होता. या पहिल्याच मालिकेद्वारे सुशांत स्टार बनला. या मालिकेनंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या.
मोठ्या पडद्यावर सुशांतला अभिषेक कपूरने पहिली संधी दिली. अभिषेक कपूरच्या काय पो छे या चित्रपटात सुशांत प्रमुख भूमिकेत झळकला होता. आता सुशांतने नवा चित्रपट साइन केला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर तर निर्मिती एकता कपूर करणार असल्याचे म्हटले जात आहे. 
एकता आणि सुशांत हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात सुशांत प्रमुख भूमिका साकारणार होता. पण या चित्रपटासाठी सुशांतकडे तारखा नसल्याने त्याने हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. पण आता एकताची निर्मिती असलेल्या केदारनाथ या चित्रपटात सुशांत प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच फितूर या चित्रपटातून सुशांत बाहेर पडल्यानंतर अभिषेक आणि सुशांत यांच्यात बिनसले होते. पण आता ते दोघे या चित्रपटाद्वारे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सुशांतसाठी स्पेशल असणार आहे. 
अभिषेक कपूर आणि एकता कपूर ही चुलत भावंडे असल्याने केदारनाथ या चित्रपटामुळे सुशांत भावा-बहिणाच्या जोडीसोबत काम करत आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput will work in Ekta Kapoor and Abhishek Kapoor's film