रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:59 IST2018-07-13T11:56:14+5:302018-07-13T11:59:38+5:30

बी-टाऊनमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर यात आणखीन एक स्टारची एंट्री झाली आहे.

'Superstar' entry in Ranbir Kapoor's 'Brahmastra' | रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

ठळक मुद्देअयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे

बी-टाऊनमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर यात आणखीन एक स्टारची एंट्री झाली आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये नागार्जुनमध्ये दिसणार आहे. 


नागार्जुन 'जख्म'नंतर जेपी दत्त यांच्या एलओसीमध्ये दिसला होता. नागार्जुन म्हणाला, मी आलियाला खूप लहान असताना बघितली होती आणि आता तर ती तिच्यासोबत काम करणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. 


गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा आहे. दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा जोरावर असतानाच रणबीरच्या कुटुंबीयांशी आलियाची जवळीक वाढते आहे. आलिया रणबीर, रणबीरची मॉम नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा यांच्यासोबत कधी डिनर एन्जॉय करताना दिसते. तर कधी रणबीर कपूर  कधी आलिया भट्ट घरी गेलेले दिसतोय. अलीकडे एका मुलाखतीत रणबीर आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे,’असे तो म्हणाला होता. 

Web Title: 'Superstar' entry in Ranbir Kapoor's 'Brahmastra'