VIDEO : अग्गं बाई असं नको करूस...; दीपिकानंतर सनी लिओनीनं घातला भगवा ड्रेस, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:26 PM2022-12-19T18:26:31+5:302022-12-19T18:27:13+5:30

Besharam Rang Controversy, Sunny Leone : ‘बेशरम रंग’चा वाद अद्याप शमला नसताना अभिनेत्री सनी लिओनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कारण आहे सनीने शेअर केलेला एक व्हिडीओ....

sunny leone gets trolled orange dress amid deepika padukone besharam rang saffron bikini | VIDEO : अग्गं बाई असं नको करूस...; दीपिकानंतर सनी लिओनीनं घातला भगवा ड्रेस, झाली ट्रोल

VIDEO : अग्गं बाई असं नको करूस...; दीपिकानंतर सनी लिओनीनं घातला भगवा ड्रेस, झाली ट्रोल

googlenewsNext

Besharam Rang Controversy : ‘पठाण’ या आगामी चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि देशभरातलं वातावरण तापलं. दीपिका पादुकोणचा  (Deepika Padukone) या गाण्यातील सुपर बोल्ड लुक आणि तिने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद सुरू झाला. इतका की, पठाणवर बहिष्कार टाकण्याची मागणी अनेकांनी लावून धरली. हा वाद अद्याप शमला नसताना आता अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कारण आहे सनीने शेअर केलेला एक व्हिडीओ.

दीपिकाच्या बिकिनीचा वाद गरम असतानाच बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सनी लिओनीही यापैकी एक. सनीने एक व्हिडीओ शेअर केला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. या व्हिडीओत सनी ऑरेंज कलरच्या आऊटफिटमध्ये मादक पोझ देताना दिसतेय. 

तिच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगं बाई हा रंग घालू नकोस, अशी कमेंट एका युजरने दिली आहे. बायकॉट सनी कधी ट्रेंड करायचं आहे? असा सवाल एका युजरने केला आहे. सनीला आता दीपिकासारखं बायकॉट केलं जातं की नाही, हे तर काळच सांगेल. पण या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे हे नक्की.

बेकरीत काम करत असताना एकेकाळी सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे वळली. सनीची एक मैत्रीण खूप चांगली डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन  पेंट हॉऊसच्या एका फोटोग्राफरशी सनीची ओळख करून दिली. यानंतरच सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी सनी बॉलिवूडकडे वळली. सनीनं एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, रईस, करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स हे सिनेमे केलेत.
 

Web Title: sunny leone gets trolled orange dress amid deepika padukone besharam rang saffron bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.