प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:16 IST2026-01-22T16:13:16+5:302026-01-22T16:16:51+5:30
मोठा धक्का! सनी देओलच्या 'बॉर्डर-२' ला 'या' आखाती देशांमध्ये बंदी, कारण काय?

प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?
Border 2 Movie: आजही देशभक्तीपर चित्रपटांबद्दल जेव्हा बोलण्यात येतं त्यावेळेस 'बॉर्डर' सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. जे.पी.दत्ता दिग्दर्शित हा सिनेमा १९९७ साली प्रदर्शित झाला होता. भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमातील कलाकारांचा अभिनयच नव्हे, तर गाण्यांमुळे देखील डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. आता जवळपास २८ वर्षानंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उद्या २३ जानेवारीला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बॉर्डर-२'(Border 2) रिलीज होणार आहे.
सनी देओल (Sunny Deol) स्टारर हा सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार,हा चित्रपट काही देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही. सौदी अरेबिया, बहरिन, कुवैत आणि ओमान, कतार या देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान विरोधी आणि संवेदनशील विषयांवर आधारित चित्रपटांच्या प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसत नाही. आता 'बॉर्डर-२' च्या रिलीजला एक दिवस बाकी असताना या देशांमध्ये सिनेमाच्या प्रदर्शित होण्याची आशा कमी आहे.
'धुरंधर'च्या बाबतीतही घडलेलं असं काही...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या सिनेमाला देखील प्रदर्शनापूर्वी या परिस्थितीचा सामाना करावा लागला होता. सुरुवातीला पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यामुळे 'धुरंधर' चित्रपटाला अंदाजे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. परंतु, बंदी असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १,००० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
दरम्यान, 'बॉर्डर २' हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी तसेच सोनम बाजवा अशा तगड्या कलाकरांची फळी आहे.