​जेनेलिया देशमुखने रितेश देशमुखला दिले वाढदिवसाला हे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:39 IST2017-12-19T10:09:13+5:302017-12-19T15:39:13+5:30

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. बॉलिवूडमधील क्यूट जोडींमधील ही एक जोडी मानली जाते. रितेशचा ...

This special gift to Genelia Deshmukh on the birthday of Riteish Deshmukh | ​जेनेलिया देशमुखने रितेश देशमुखला दिले वाढदिवसाला हे खास गिफ्ट

​जेनेलिया देशमुखने रितेश देशमुखला दिले वाढदिवसाला हे खास गिफ्ट

तेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. बॉलिवूडमधील क्यूट जोडींमधील ही एक जोडी मानली जाते. रितेशचा नुकताच ४० वा वाढदिवस झाला. त्याचा हा वाढदिवस त्याच्या बायकोने म्हणजेच जेनेलिया डिसोजा देशमुखने खूप चांगल्या प्रकारे साजरा केला. तिने रितेशला एक खूप छान आणि अतिशय महागडे असे गिफ्ट दिले आहे. रितेशनेच ही गोष्ट सोशल मीडियाच्याद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. जेनेलियाने वाढदिवसाला दिलेल्या गिफ्टचा फोटो रितेशने ट्विटरवर शेअर केला आहे. जेनेलियाने रितेशनला गिफ्ट म्हणून टेस्ला एक्स ही महागडी कार दिली आहे. ही कार नुकतीच भारतात लाँच झाली आहे. रितेशने या गाडीसोबत त्याचा आणि जेनेलियाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत रितेशने एक खूपच छान पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ४० वर्षांच्या बर्थ डे बॉयला २० वर्षांचा असल्याप्रमाणे कसे जाणवून द्यायचे हे माझ्या बायकोला नेमके माहीत आहे. 

riteish deshmukh
जेनेलियाने रितेशला गिफ्ट केलेल्या या टेस्ला एक्स गाडीची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या गाडीची किंमत ६८ लाखांच्या घरात आहे. ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालते. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी १३५ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट धावते. साधरणत: एक कोटींहून अधिक किंमतीच्या इम्पोर्टेड गाड्यांवर 20 लाखांपर्यंतचा कर आकारला जातो. मात्र टेस्ला ही पूर्णपणे विजेवर चालणारी कार असल्याने आरटीओच्या करांमधून या गाडीला सूट मिळाली असल्याचे म्हटले जाते. 
रितेश आणि जेनेलिया यांची तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तब्बल नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. बॉलिवूडमधील ब्रेकअप्स आणि पॅचअप्सचे किस्से समोर येत असताना रितेश आणि जेनेलियाची प्रेमकथा अशी काही बहरली की, त्याचा अखेर लग्नात झाला. या दाम्पत्याला आता राहील आणि रियान नावाची दोन गोंडस मुले असून त्यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात यंगेस्ट कपल म्हणून बघितले जाते. 

riteish deshmukh

Also Read : आपल्या मुलांसाठी रितेश देशमुखचे हे ‘लयभारी’ काम, वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Web Title: This special gift to Genelia Deshmukh on the birthday of Riteish Deshmukh