लग्नाच्या अफवांवर अखेर बोलली सोनम कपूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:08 IST2018-01-10T09:38:15+5:302018-01-10T15:08:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नानंतर सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत एप्रिल महिन्यामध्ये ...

Sonam Kapoor talks about wedding rumors | लग्नाच्या अफवांवर अखेर बोलली सोनम कपूर...

लग्नाच्या अफवांवर अखेर बोलली सोनम कपूर...

लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नानंतर सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत एप्रिल महिन्यामध्ये जोधपूर डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे बोलले जाते आहे. मात्र खुद सोनमने या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत पूर्णविराम लगावला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार सोनम कपूर म्हणाली की, गेल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये मी कधी माझ्या वैयक्तिक आयुषाबाबत मी बोलले नाही. माझा वीर दी वेडिंग हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि त्याआधी पॅडमॅन. त्यामुळे माझ्याकडे सध्या आणखीन कोणत्या गोष्टीसाठी वेळ नाही आहे.  

सोनम पुढे म्हणाली, लवकरच ती विधू विनोद चोप्राच्या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांपासून सुरु करणार आहे. 2016 मध्ये नीरजा चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सोनम इंडस्ट्रीतून गायब झाली होती. मात्र 2018मध्ये सोनमचे जवळपास तीन चित्रपट रिलीज होणार असल्याचे कळतेय.  

सोनमने यावर्षी नव्या वर्षाचे स्वागत पेरिसमध्ये आनंद अहुजासोबत होते. सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या कधी स्वीकरले नाही आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे.   

ALSO READ :  ​मासिक पाळीच्या काळात देवळात आणि किचनमध्ये जायचे नाही असे सोनम कपूरला बजावले होते तिच्या आजीने

सोनमचा लवकरच 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिझी आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत  

Web Title: Sonam Kapoor talks about wedding rumors