सिद्धार्थ-सोनाक्षी ‘इत्तेफाक’ मध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 16:31 IST2016-04-30T11:01:57+5:302016-04-30T16:31:57+5:30

दिग्दर्शक यश चोप्रा यांनी अभिनेता राजेश खन्ना आणि नंदा यांच्यासह १०६९ मध्ये ‘इत्तेफाक’ चित्रपट बनवला. आता शाहरूख खान ‘रेड ...

Siddhartha-Sonakshi in 'Ittefaq'? | सिद्धार्थ-सोनाक्षी ‘इत्तेफाक’ मध्ये?

सिद्धार्थ-सोनाक्षी ‘इत्तेफाक’ मध्ये?

ग्दर्शक यश चोप्रा यांनी अभिनेता राजेश खन्ना आणि नंदा यांच्यासह १०६९ मध्ये ‘इत्तेफाक’ चित्रपट बनवला. आता शाहरूख खान ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ च्या बॅनरखाली आता सिद्धार्थ मल्होत्रा-सोनाक्षी सिन्हा या जोडीला घेऊन चित्रपट बनवणार आहे.

शाहरूख खान त्याच्या होम प्रोडक्शन अंतर्गत यावेळी काम करताना दिसणार नाही. याअगोदर ही जोडी कधीही एकत्र आली नाही. ही जोडी स्क्रीनवर मात्र फारच सुंदर दिसेल अशी अपेक्षा आहे. यश चोप्रा यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांना घेऊन हा क्राईम थ्रिलर बनवला होता.

आता अफवा तर अशा आहेत की, बी. आर.चोप्रा यांचा नातू अभय चोप्रा यावेळी दिग्दर्शनाचे काम पाहणार आहे. यावेळी शाहरूख निर्मात्याच्या भूमिकेत दिसेल. त्याच्याकडे अगोदरच तीन मोठे प्रोजेक्ट्स आहेत.

शाहरूख सध्या आनंद एल.राय आणि इम्तियाज अली यांच्यासोबत मोठे चित्रपट साकारण्यासाठी व्यस्त आहे. 

ittefaq

Web Title: Siddhartha-Sonakshi in 'Ittefaq'?