सिद-जॅकलीनचे मिआमीत ‘बँग बँग’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 09:51 IST2016-06-10T04:21:38+5:302016-06-10T09:51:38+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांनीही ‘बँग बँग’  चित्रपटाच्या सिक्वेलसाठी शूटींग सुरू केली आहे. ते सध्या एका डान्स ...

Sid-Jacqueline's 'Bang Bang' in the middle! | सिद-जॅकलीनचे मिआमीत ‘बँग बँग’ !

सिद-जॅकलीनचे मिआमीत ‘बँग बँग’ !

द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांनीही ‘बँग बँग’  चित्रपटाच्या सिक्वेलसाठी शूटींग सुरू केली आहे. ते सध्या एका डान्स सिक्वेन्ससाठी काम करत आहेत. दिग्दर्शक राज निदीमोरू आणि ‘हॅप्पी एंडींग’ फेम कृष्णा डीके यांचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट असणार आहे.

चित्रपटाचे शूटींग मागील महिन्यातच सुरू झाली आहे. पहिल्यांदा चित्रपटाचे शीर्षक ‘रिलोडेड’ असे देण्यात आले होते, नंतर मिआमी आणि मलेशिया येथे शूटींग सुरू झाली. हा चित्रपट या सिद्धार्थ आणि जॅकलीन या दोघांचा दुसरा चित्रपट असून त्यांनी याअगोदर ‘ब्रदर्स’ मध्ये त्यांनी काम केले आहे.

याचवर्षी सिद्धार्थने ‘बार बार देखो’ चित्रपटात कॅटरिना कैफसोबत काम केले आहे. तसेच जॅकलीनचाही ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाला चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे. थोड्याच दिवसांत ‘ढिशूम’ चित्रपट रिलीज होणार आहे. तरीही या दोघांना आॅनस्क्रीन पहायला आपल्याला नेहमीच आवडते हो ना?

bang bang sequel

Web Title: Sid-Jacqueline's 'Bang Bang' in the middle!