Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 14:24 IST2020-06-25T14:23:00+5:302020-06-25T14:24:24+5:30

प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील धक्कादायक खुलासा केला होता. यात तिने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दलही सांगितले आहे.

Shocking! In front of Priyanka Chopra, the director had made obscene comments on clothes, then she did something like that | Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही

Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही

जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही या व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे कित्येक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. अशात बॉलिवूडमधील बरेच किस्से व जुन फोटो व व्हिडिओ पहायला मिळत आहे. यादरम्यान प्रियंका चोप्राची एक मुलाखत व्हायरल होताना दिसत आहे. यात ती बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल बोलत आहे. यादरम्यान तिने बरेच धक्कादायक खुलासे केले.  

प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये आली होती त्यावेळी तिचे कुणीच गॉडफादर नव्हते. तिला इंडस्ट्रीत तिचे स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. तिचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या मुलाखतीत ती सांगतेय की, ती जेव्हा इंडस्ट्रीत आली होती तो खूप कठीण काळ होता. मी इथे कुणालाच ओळखत नव्हते. जेव्हा मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते त्यावेळी इथे प्रत्येक जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते.


प्रियंकाने सांगितले होते की मी नेटवर्किंगमध्ये इतके चांगले नव्हते. मी जास्त पार्टीजला जात नव्हते. माझ्यासाठी थोडे कठीण होते. पण मी हे सत्य स्वीकारले होते की या सर्व गोष्टींना मला घाबरायचे नाही.


प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती इंडस्ट्रीत आली होती त्यावेळी तिने तिच्या अटींनुसार काम केले नाही आणि कोणाच्या दबावाखाली कोणते पाऊल उचलले. करियरच्या सुरूवातीला एक दिग्दर्शक तिच्याबाबतीत खूप घाणेरडी गोष्ट बोलला होता. ते ऐकून तिच्या मनात आले होते की दिग्दर्शकाचा गळा दाबावा.


प्रियंका पुढे म्हणाली की, दिग्दर्शकाने माझ्या ड्रेस डिझायनरलादेखील खूप चीप गोष्ट बोलला की ड्रेस एवढा छोटा असला पाहिजे की.... हे ऐकून माझं डोकच फिरलं. चित्रपटाचे दोन दिवसाचं शूटिंग झालेले होते. दुसऱ्या दिवशी घरी आले. इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे तेवढे पैसेदेखील नव्हते. मी माझ्या आईला म्हटलं की, सायनिंग अमाउंट परत करून टाक आणि दोन दिवस जो खर्च झाला आहे. तोदेखील देऊन टाक. मला हा सिनेमा करायचा नाही. माझ्यासोबत असे कित्येक वेळा झालं आहे आणि मी चित्रपट सोडून दिला आहे. मी खूप सेल्फ रिस्पेक्टिंग आहे. माझा आत्मसन्मान सर्वात जास्त महत्त्वाचा आहे.

Web Title: Shocking! In front of Priyanka Chopra, the director had made obscene comments on clothes, then she did something like that