Animal: 'लेकाचं यश पाहायला आज ऋषी हवा होता'; रणबीरचं काम पाहून भारावले शक्ती कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:19 PM2023-12-13T13:19:52+5:302023-12-13T13:20:27+5:30

Shakti kapoor: या सिनेमात शक्ती कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

shakti-kapoor-remembered-his-friend-rishi-kapoor-on-success-of-ranbir-kapoor-film-animal | Animal: 'लेकाचं यश पाहायला आज ऋषी हवा होता'; रणबीरचं काम पाहून भारावले शक्ती कपूर

Animal: 'लेकाचं यश पाहायला आज ऋषी हवा होता'; रणबीरचं काम पाहून भारावले शक्ती कपूर

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)  याचा Animal  हा सिनेमा चांगलाच गाजताना दिसतोय. अनिल कपूर (anil kapoor), बॉबी देओल (bobby deol) , रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) , उपेंद्र लिमये (upendra limaye) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात झळकली आहे. या सिनेमाच्या कथानकापासून ते त्यातील कलाकारांचा अभिनय, त्यातील गाणी सारं काही चर्चेत येत आहे. यात खासकरुन रणबीरच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. रणबीरचं हेच यश पाहून अभिनेता शक्ती कपूर भारावून गेले आहेत. इतकंच नाही तर 'लेकाचं हे यश पाहण्यासाठी आज ऋषी कपूर हवे होते', असंही त्यांनी म्हटलं आहे.

अलिकडेच शक्ती कपूर (Shakti kapoor) यांनी ई टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी रणबीरच्या अभिनयाचं, सिनेमाचं कौतुक केलं. परंतु, यावेळी बोलत असताना त्यांना दिवगंत अभिनेता ऋषी कपूर यांची आठवण आली.

36 एकर जमिनीवर संदिप रेड्डी वांगा यांनी फिरवला नांगर; Animal साठी विकली वडिलोपार्जित जमीन

"या सिनेमाचा अनुभवच फार अप्रतिम होता. मला अगदी सुरुवातीपासूनच माहित होतं की हा सिनेमा सुपरहिट होणार. पहिल्याच दिवशी ज्यावेळी मी संदिप रेड्डी वांगासाठी शॉट दिला तेव्हाच मी त्याला म्हटलं हा सिनेमा जबरदस्त व्यवसाय करेल", असं शक्ती कपूर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "चिंटू (ऋषी कपूर) माझ्यापेक्षा फक्त १ दिवसाने लहान होता. त्याचं आणि त्याच्या मुलाचं एक वेगळंच नातं होतं. आम्ही दोघांची फॅमिलीही बऱ्याचदा एकत्र फिरायला जायची. आज रणबीरने जे कमावलंय ते पाहायला चिंटू हवा होता असं मला प्रकर्षाने वाटतंय. त्याचा लेक सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे हे पाहूनच मला खूप अभिमान वाटतो."

दरम्यान, या सिनेमात रणबीरसोबत शक्ती कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रणबीरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत ६०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या काळात हा सिनेमा ७०० कोटींची कमाई नक्कीच करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 

Web Title: shakti-kapoor-remembered-his-friend-rishi-kapoor-on-success-of-ranbir-kapoor-film-animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.