​शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 11:44 IST2016-09-08T06:02:23+5:302016-09-08T11:44:13+5:30

किंग खान शाहरुख आणि ‘तनु वेडस् मनू’ फेम दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमाचे नाव काय याबाबत बरेच ...

Shahrukh's upcoming movie is not called 'Bandua'! | ​शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ नाही!

​शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ नाही!

ंग खान शाहरुख आणि ‘तनु वेडस् मनू’ फेम दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमाचे नाव काय याबाबत बरेच उलटसुलट तर्क लावले जात आहे. दरम्यान या चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ असल्याची अफवा पसरली. यावर लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची आनंद यांना आता गरज वाटत आहे. 

नुकतेच त्यांनी जाहीर केले की, प्रथमच शाहरुख सोबत करत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ नाही. सध्या मी पटकथेवर काम करत असून अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. ते जसे होईल, आम्ही अधिकृत घोषणा करू, असे ते म्हणाले. 

चित्रपटाचे कथानक एका ठेंगण्या व्यक्तीभोवती फिरते. यामध्ये एक चांगली प्रेमकथा पाहायला मिळेल अशीदेखील त्यांनी माहिती दिली. या वर्षाच्या शेवटी सिनेमाची शूटींग सुरू होणार असून २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात तो प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे.

Web Title: Shahrukh's upcoming movie is not called 'Bandua'!