प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखचा 'डंकी' डगमगला, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 11:38 IST2023-12-23T11:37:06+5:302023-12-23T11:38:06+5:30

आता विकेंड कलेक्शनच 'डंकी'ला तारु शकेल.

Shahrukh Khan s Dunki flop on second day due to prabhas s salaar release | प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखचा 'डंकी' डगमगला, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत कमालीची घट

प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखचा 'डंकी' डगमगला, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत कमालीची घट

अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' (Dunki) नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी डंकीने केवळ 29 कोटींचा बिझनेस केला. तर दुसऱ्या दिवशी प्रभासचा 'सालार' रिलीज झाल्याने डंकीची हवा टाईट झाली आहे. कारण सालारने पहिल्याच दिवशी 95 कोटींचा गल्ला जमवत रेकॉर्ड केला आहे. शाहरुखचा 'डंकी' दुसऱ्या दिवशीपासूनच डगमगताना दिसतोय.

2023 हे वर्ष शाहरुखसाठी फार खास ठरलं. 'पठाण' आणि 'जवान' नंतर 'डंकी' हा शाहरुखचा सलग तिसरा सुपरहिट ठरेल असा अंदाज होता. मात्र पहिल्या दोन सिनेमांच्या तुलनेत डंकीला फारसा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. sacnikl रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 'डंकी'च्या कलेक्शन 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. सिनेमाच्या एडव्हान्स बुकिंगनेच खरंतर कात टाकली होती. 'डंकी'चं अॅडव्हान्स बुकिंग केवळ 15.41 कोटी झालं होतं. तर सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी केवळ 29 कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी 20.50 कोटी कमावले. सध्या 'डंकी'चं एकूण कलेक्शन 49.70 कोटी इतकं आहे. पहिल्या दिवशी जिथे सकाळी सहाचे शोही फूल झाले तिथे दुसऱ्या दिवशी 14 टक्के घट झाली. तर दिवसभरातील शोजमध्येही २ ते ३ टक्क्यांची घट दिसली. आता विकेंड कलेक्शनच 'डंकी'ला तारु शकेल.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमाची जादू त्यांच्या इतर सिनेमांसारखी चाललेली दिसत नाही. '3 इडियट्स','संजू','मुन्नाभाई एमबीबीएस','पीके' यासारखे हिट चित्रपट देणारे राजू हिरानी यांनी पहिल्यांदाच शाहरुखसोबत काम केले. मात्र प्रेक्षकांनी सिनेमाला फारसा प्रतिसाद दिला नाही.

 तर दुसरीकडे प्रशांत नील यांचा 'सालार' बाजी मारत आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 48.94 कोटींचा व्यवसाय केला होता. तर पहिल्या दिवशी 95 कोटींचं कलेक्शन घेत 'सालार'ने रेकॉर्ड रचला. हा सिनेमा प्रभासचं करिअर पुन्हा रुळावर आणण्यासाठी फायदेशीर ठरतोय.

Web Title: Shahrukh Khan s Dunki flop on second day due to prabhas s salaar release