‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर जात आहे शाहरूख खान; अडीच तासांचे मोजतोय १.६ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 16:40 IST2018-04-14T11:10:05+5:302018-04-14T16:40:05+5:30

वेळेची किंमत पैशांपेक्षा जास्त आहे, ही बाब बॉलिवूडचा किंग शाहरूख खान खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहे. त्यामुळेच तो वेळ ...

Shahrukh Khan is going to the helicopter set for this reason; Two and a half hours measuring 1.6 lakh! | ‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर जात आहे शाहरूख खान; अडीच तासांचे मोजतोय १.६ लाख!

‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर जात आहे शाहरूख खान; अडीच तासांचे मोजतोय १.६ लाख!

ळेची किंमत पैशांपेक्षा जास्त आहे, ही बाब बॉलिवूडचा किंग शाहरूख खान खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहे. त्यामुळेच तो वेळ वाचविण्यासाठी सध्या चक्क प्रायव्हेट चॉपरने शूटिंगस्थळी जात आहे. सध्या शाहरूख दिग्दर्शक आनंद राय यांच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात तो दररोज मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी प्रायव्हेट चॉपरने प्रवास करीत आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची शूटिंग वसई येथे सुरू आहे. अशात तो शूटिंगस्थळ गाठण्यासाठी दररोज प्रायव्हेट चॉपरचा वापर करीत आहे. यासाठी त्याला मोठी रक्कमही मोजावी लागत आहे. 



शाहरूख नाइट शूटसाठी सायंकाळी ७ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत सेटवर असतो. त्यानंतर तो घरी परततो. दरम्यान, त्याला या संपूर्ण प्रवासाचा एका आठवड्याचा खर्च तब्बल १० लाख ५० हजार इतका भरावा लागत आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरूख ‘झीरो’चा सहनिर्मातादेखील आहे. शाहरूख या चित्रपटात बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा प्रोमो समोर आला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरूखसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यादेखील चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 



दरम्यान, गेल्या काही काळाचा विचार केल्यास शाहरूखला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्याचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत असल्याने ‘झीरो’कडून त्याला प्रचंड अपेक्षा आहे. अशात चित्रपट सर्व अंगांनी सर्वोत्कृष्ट ठरावा यासाठी धडपड करीत आहे. त्यासाठी तो लाखो रुपये खर्च करण्यास तयार असल्याचेच यावरून दिसून येते. 

Web Title: Shahrukh Khan is going to the helicopter set for this reason; Two and a half hours measuring 1.6 lakh!