'माझ्यासोबत एक सिनेमा करा, तुमच्यासाठी विमानावर छैय्या-छैय्या करेन'; किंग खानची मणिरत्नमला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:10 PM2024-01-11T14:10:40+5:302024-01-11T14:11:41+5:30

Shahrukh khan: शाहरुखने पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्यासोबत काम करायची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.

shahrukh-khan-appeals-to-maniratnam-to-work-with-him-again | 'माझ्यासोबत एक सिनेमा करा, तुमच्यासाठी विमानावर छैय्या-छैय्या करेन'; किंग खानची मणिरत्नमला विनंती

'माझ्यासोबत एक सिनेमा करा, तुमच्यासाठी विमानावर छैय्या-छैय्या करेन'; किंग खानची मणिरत्नमला विनंती

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (shahrukh khan) सध्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीनही सिनेमाचं यश एन्जॉय करतोय. अलिकडेच  एका कार्यक्रमामध्ये शाहरुख आणि मणिरत्नम (mani ratnam) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शाहरुखने मणिरत्नम यांच्याकडे पुन्हा एकदा काम मागितलं आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही माझ्यासोबत एखादा सिनेमा करायला तयार झालात तर मी विमानावर चढून छैय्या-छैय्या डान्स करेन, असंही तो म्हणाला.

अलिकडेच शाहरुख आणि मणिरत्नम यांनी 'सीएनएन न्यूज 18 'च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शाहरुखने पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी शाहरुखने त्यांच्या 'दिल से' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातं 'छैय्या-छैय्या' हे गाणं खूप गाजलं होतं. विशेष म्हणजे 'याच गाण्यावर मी पुन्हा डान्स करेन' असं शाहरुख मस्करीमध्ये म्हणाला.

"आता मी सगळ्यांसमोरच जाहीरपणे तुम्हाला विनंती करतो. माझ्यासोबत एक सिनेमा करा. मी शप्पथ घेऊन सांगतो जर तसं झालं तर मी छैय्या-छैय्या विमानाच्या वर चढून करेन", असं शाहरुख म्हणाला.  किंग खानच्या या वक्तव्यावर मणिरत्नम यांनीही तितक्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिलं.

"जेव्हा शाहरुख विमान खरेदी करेल तेव्हा मी त्याच्यासोबत सिनेमा करेन", असं मणिरत्नम म्हणाले. त्यावर," मणि.. ज्या प्रकारे माझे सिनेमा चालतायेत ते पाहता विमान सुद्धा आता फार दूर नाहीये. मी येतोय!", असं उत्तर दिलं.  हा कार्यक्रम संपत असताना पुन्हा एकदा शाहरुखने मणिरत्नम यांच्यासोबत मस्करी केली.  "नव्या सिनेमासाठी धन्यवाद मणी..मार्च, मी तिथे असेन ,सर.. मॉर्निंग शिफ्ट, दुपारी २ वाजता", असं शाहरुख म्हणाला.

दरम्यान,पठाण, जवान आणि डंकीच्या यशानंतर शाहरुखच्या आगामी सिनेमाची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. शाहरुख सुजॉय घोषच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच तो विशाल भारद्वाज यांच्याही सिनेमात काम करण्याच असल्याची चर्चा आहे.

Web Title: shahrukh-khan-appeals-to-maniratnam-to-work-with-him-again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.