करिना कपूरच्या प्रश्नांवरून शाहिद कपूर वैतागला... ‘असे’ दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 17:12 IST2017-03-25T11:42:52+5:302017-03-25T17:12:52+5:30

अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्यात आता कुठल्याही प्रकारचे नाते नसले तरी, शाहिदला आजही करिनासोबतच्या अफेअरविषयीचे प्रश्न विचारले ...

Shahid Kapoor wattagala karna kapoor questions ... answered 'Reply' | करिना कपूरच्या प्रश्नांवरून शाहिद कपूर वैतागला... ‘असे’ दिले उत्तर!!

करिना कपूरच्या प्रश्नांवरून शाहिद कपूर वैतागला... ‘असे’ दिले उत्तर!!

िनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्यात आता कुठल्याही प्रकारचे नाते नसले तरी, शाहिदला आजही करिनासोबतच्या अफेअरविषयीचे प्रश्न विचारले जातात. मात्र यावेळेस जेव्हा त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने अशा काही मिश्किल शैलीत उत्तर दिले की, विचारणाराही त्यांच्यातील नात्याविषयी जाणून घेण्यास अबोल झाला. 



एका न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार शाहिदला करिनासोबतच्या नात्यांबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्याने व्यंगात्मक पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला की, माझे आणि करिनाचे नाते जगातील सर्वांत मोठे रहस्य आहे. शाहिदच्या या उत्तरानंतर त्याला करिनाविषयी कुठल्याही स्वरुपाचा प्रश्न विचारला गेला नाही. त्याचबरोबर शाहिद आता करिनाच्या प्रश्नावर बोलू इच्छित नाही, हेही त्याच्या या उत्तरावरून स्पष्ट होते. 

दरम्यान, एकेकाळी शाहिद आणि करिना यांच्यातील प्रेमसंबंध चांगलेच फुलले होते. मात्र काही काळानंतरच त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे हे दोघेही त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात पुढे आले आहेत. दोघांनीही लग्न केले असून, एक-एक मुलाचे आई-बाप आहेत. मात्र अशातही शाहिदला करिनाविषयी प्रश्न विचारले जातात. शाहिदच्या मते आता या विषयात फार काही तथ्य किंवा नावीन्य राहिले नाही. त्यामुळे यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अशातही कोणाच्या मनात यावरून काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी हे जगातील सगळ्यात मोठे रहस्य असावे असे शाहिद म्हणतो. 



एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शाहिदला करिनाविषयी विचारण्यात आले होते. करिना आणि शाहिद २००४ पासून २००७ पर्यंत एकमेकांना डेट करीत होते. त्यांची लव्हस्टोरी अशी काही बहरली होती की, बॉलिवूडमध्ये हे लव्हबर्ड सदैव चर्चेत असायचे. पुढे ते विभक्त झाले. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहिद आणि करिना एकत्र बघावयास मिळाले होते. मात्र यासाठी दोघांनी एकत्र शूटिंग केली नव्हती. त्यानंतर करिनाचा पती सैफ अली खानसोबत शाहिद ‘रंगून’मध्ये बघावयास मिळाला होता. 

Web Title: Shahid Kapoor wattagala karna kapoor questions ... answered 'Reply'