"इतकं लाजायला काय झालं?" असं विचारत शबाना आझमींनी शेअर केला फोटो, विकी कौशल कमेंट करत म्हणाला...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:39 IST2026-05-06T18:21:24+5:302026-05-06T18:39:26+5:30
शबाना आझमींनी विचारलेल्या एका प्रश्नावर विकी कौशल लाजताना दिसला

"इतकं लाजायला काय झालं?" असं विचारत शबाना आझमींनी शेअर केला फोटो, विकी कौशल कमेंट करत म्हणाला...”
दररोज सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होतात, पण काही फोटो खऱ्या अर्थाने मन जिंकतात. बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता विकी कौशल यांचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये विकी हा शबाना आझमींच्या जवळ बसलेला दिसून येत आहे. शबाना आझमींनी विचारलेल्या एका प्रश्नावर विकी कौशल लाजताना दिसला, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या संवादाची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी विकीच्या या नम्र स्वभावाचे आणि संस्कारांचे भरभरून कौतुक केले आहे.
शबाना आझमी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. एखाद्या कार्यक्रमात काढलेला हा फोटो असल्याचं दिसतं. फोटोमध्ये शबाना खुर्चीवर बसलेल्या आहेत, तर विकी त्यांच्या जवळ नम्रपणे बसलेला दिसतो. शबाना त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसतात, तर विकी लाजलेला दिसतोय. या फोटोसोबत शबानांनी कॅप्शन दिलं, "विकी कौशल, मी असं काय बोलले की तू इतका लाजलास?" यावर विकीनेही मजेशीर उत्तर देत लिहिलं, "मी सांगितलं असतं, पण मला अजूनही लाज वाटते". या फोटोवर केवळ चाहतेच नाही, तर अनेक सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने हार्ट इमोजी पोस्ट करत "सुंदर फोटो" अशी कमेंट केली आहे.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'छावा' (Chhaava) हा चित्रपट ऐतिहासिक ब्लॉकबास्टर ठरला. यात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता विकी कौशल दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित होणार आहे. तसेच विकी एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'महावतार' या चित्रपटात तो भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम साकारताना दिसणार आहे.