सावत्र आई आणि सैफ आहेत सारा खानचे फेव्हरेट कपल, म्हणाली- "माझे वडील आणि करीना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:19 IST2025-06-05T11:19:03+5:302025-06-05T11:19:38+5:30

चाहत्यांप्रमाणेच सैफ-करीनाची जोडी ही सारा खानचीही फेव्हरेट आहे. साराने नुकतंच एका इव्हेंटमध्ये सैफ आणि सावत्र आई करीना कपूरला फेव्हरेट जोडी म्हटलं आहे.

sara khan said saif ali khan and kareena kapoor is my favourite couple | सावत्र आई आणि सैफ आहेत सारा खानचे फेव्हरेट कपल, म्हणाली- "माझे वडील आणि करीना..."

सावत्र आई आणि सैफ आहेत सारा खानचे फेव्हरेट कपल, म्हणाली- "माझे वडील आणि करीना..."

सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ही सेलिब्रिटी जोडी अनेकांची फेव्हरेट आहे. याशिवाय त्यांच्याकडे परफेक्ट जोडी म्हणूनही पाहिलं जातं. चाहत्यांप्रमाणेच सैफ-करीनाची जोडी ही सारा खानचीही फेव्हरेट आहे. साराने नुकतंच एका इव्हेंटमध्ये सैफ आणि सावत्र आई करीना कपूरला फेव्हरेट जोडी म्हटलं आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सारा खान 'मेट्रो इन दिनो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या सारा बिझी आहे. 'मेट्रो इन दिनो' सिनेमात सारासोबत पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, आदित्य रॉय कपूर, कोकणा सेन शर्मा, अली फझल, फातिमा शेख अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानच एका कार्यक्रमात पत्रकाराने साराला "हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अशी कोणती जोडी आहे ज्यांचं लग्न झालेलं आहेत, ते यशस्वी आहेत आणि तुझे फेव्हरेटही आहेत", असा प्रश्न विचारला. सुरुवातीला हा प्रश्न ऐकून सारा गोंधळून गेली होती. मात्र नंतर तिने उत्तर देत सैफ आणि करिनाचं नाव घेतलं. "माझे वडील आणि करीना", असं ती म्हणाली. 


दरम्यान, सारा खान ही सैफ आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफने १९९१मध्ये अमृताशी लग्न केलं होतं. मात्र २००४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४मध्ये त्याने करीनाशी लग्न करत पुन्हा संसार थाटला. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत.  

Web Title: sara khan said saif ali khan and kareena kapoor is my favourite couple