'...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:25 IST2023-07-27T12:23:52+5:302023-07-27T12:25:01+5:30

समंथाची चक्क एका माकडाशीच मैत्री झालेली दिसते.

samantha ruth prabhu bali trip photos a monkey took selfie with her went viral | '...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos

'...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos

साऊथमधील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या बाली येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. समंथाने तिच्या आजारपणामुळे अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. गेल्यावर्षीच अभिनेत्रीने मायोसायटिस आजार झाल्याची माहिती दिली होती. घटस्फोट, आजारपण अशी एकामागोमाग एक वादळं तिच्या आयुष्यात आली. आता तिने कामातून विश्रांती घेत स्वत:ला वेळ देण्याचं ठरवलं आहे. समंथाने बाली येथील काही फोटो पोस्ट केलेत त्यातला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

समंथा मित्रपरिवारासोबत इंडोनेशियात फिरायला गेली आहे. तिथले अनेक सुंदर क्षण ती कॅमेऱ्यात कैद करत असून सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तिकडे समंथाची चक्क एका माकडाशीच मैत्री झालेली दिसते. समंथाने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोत एक माकड तिच्या मांडीवर बसलं असून चक्क सेल्फी घेताना दिसतंय. कधी हे माकड तिच्या हातावर बसलंय तर कधी पाण्यात पोहोताना दिसतंय. हे सगळे क्षण तिने क्लिक केले असून चाहत्यांसोबत शेअर केलेत. समांथाचे हे फोटो चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडलेत.

दरम्यान, समंथाने साऊथसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मनोज वाजपेयीच्या 'फॅमिली मॅन 2' मध्ये ती दिसली होती. गेल्या काही काळापासून समंथाची प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने काही काळासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत 'खुशी' या सिनेमात झळकणार आहे. 

Web Title: samantha ruth prabhu bali trip photos a monkey took selfie with her went viral