सलमान पाहणार ऐशचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:12 IST2016-05-16T07:42:14+5:302016-05-16T13:12:14+5:30

दबंग सलमान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लवस्टोरीचा द एंड होऊन आता बरीच वर्ष लोटली आहेत. दोघंही आपापल्या लाइफमध्ये ...

Salman will watch Aishwarya's cinema | सलमान पाहणार ऐशचा सिनेमा

सलमान पाहणार ऐशचा सिनेमा

ंग सलमान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लवस्टोरीचा द एंड होऊन आता बरीच वर्ष लोटली आहेत. दोघंही आपापल्या लाइफमध्ये बिझी आहेत.. ब्रेकअपनंतर दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं. मात्र आता दोघंही झालं गेलं विसरुन पुढे जाण्यासाठी तयार आहेत. नुकतंच सलमाननं ऑलिम्पिकचा ब्रँड ऍम्बेसेडर होणं यांत काहीच गैर नसून ती स्वागतार्ह बाब असल्याचं ऐश्वर्यानं जाहिररित्या म्हटलं होतं. इतकंच नाही तर ऐश सलमानच्या रेस्टॉरन्ट कॉर्नर हाऊस इथंही गेली होती. त्यामुळं दोघांमधला कडवटपणा कमी होत असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहेत. त्यातच आता ब-याच वर्षांनतर सलमान आणि ऐश एकत्र येणार आहे. दोघंही एकमेकांसमोर येणार आहेत.. निमित्त आहे ऐश्वर्याच्या आगामी 'सरबजीत' या सिनेमाचं. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला सलमान खान उपस्थिती लावणार आहे. मात्र स्क्रीनिंगचं निमंत्रण सलमानला ऐशनं दिलेलं नाही. सरबजीत सिंग यांच्या बहिण दलबीर कौर यांनी सलमानला हे निमंत्रण दिलंय. आता यानिमित्ताने का होईना सलमान आणि ऐश ब-याच वर्षांनी समोरासमोर येतील..

Web Title: Salman will watch Aishwarya's cinema