सलमान करणार ‘स्ट्रीपटीझ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 13:11 IST2016-09-08T07:41:40+5:302016-09-08T13:11:40+5:30

आपल्या अभिनया बरेबरच सलमान खान त्याच्या पीळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटात तो शर्ट उतरवून प्रेक्षकांना आपल्या परफेक्ट बॉडीचे ...

Salman Khan's 'Striptease' | सलमान करणार ‘स्ट्रीपटीझ’

सलमान करणार ‘स्ट्रीपटीझ’

ल्या अभिनया बरेबरच सलमान खान त्याच्या पीळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटात तो शर्ट उतरवून प्रेक्षकांना आपल्या परफेक्ट बॉडीचे दर्शन देतो. आता असे कित्येक चाहते आहेत जे चित्रपटात वाटच पाहत असतात की, सल्लूमियां शर्ट कधी काढतो. तो हे स्टाईल म्हणून जरी करत असला तरी पुढच्या सिनेमात तो खऱ्या अर्थाने ‘स्ट्रीपटीझ’ करणार आहे. 

सत्तर-ऐंशीच्या दशकात अमेरिकेत ‘चिपेनडेल्स’ नावाने लोकप्रिय मेल स्ट्रीपटीझ क्लब सुरू करणाऱ्या सोमेन बॅनर्जीच्या जीवनावर आधारित चित्रपटाची सलमान निर्मिती करणार आहे. पुरुषांच्या मादक नृत्यांसाठी हा क्लब प्रसिद्ध होता. 

बंगालमध्ये अत्यंत गरिबीत वाढलेल्या सोमेनने अमेरिकेत या बदनाम व्यावसायात चांगलेच नाव कमावले होते. त्यांची कथा चंदेरी पडद्यावर रंगवण्यासाठी सलमानने पुढाकार घेतला असून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.

Web Title: Salman Khan's 'Striptease'