रोनाल्डोने सलमान खानला केलं इग्नोर? भाईजानच्या चाहत्यांनी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:07 AM2023-10-31T11:07:28+5:302023-10-31T11:08:24+5:30

या फोटोत रोनाल्डो आणि सलमान खान एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत.

Ronaldo ignored Salman Khan Bhaijaan s fans shared the photo and gave a bitter reply | रोनाल्डोने सलमान खानला केलं इग्नोर? भाईजानच्या चाहत्यांनी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

रोनाल्डोने सलमान खानला केलं इग्नोर? भाईजानच्या चाहत्यांनी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांचा बॉक्सिंग मॅच बघतानाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये रोनाल्डो सलमान खानला थेट इग्नोर करताना दिसलं. तसंच सलमानपेक्षा जास्त रोनाल्डोला फुटेज मिळत आहे हेही व्हिडिओतून जाणवलं. यानंतर सोशल मीडियावर सलमानची चेष्टा सुरु झाली. मात्र आता भाईजानच्या चाहत्यांनी एक फोटो शेअर करत खिल्ली उडवणाऱ्यांची बोलतीच बंद केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे MMA बॉक्सिंग मॅच झाली. ही मॅच लाईव्ह पाहण्यासाठी फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डोसह अनेक दिग्गज आले होते. त्यातच सलमान खानही होता. सलमान खान आणि रोनाल्डो एका रांगेतच बसले होते. मॅच नंतर रोनाल्डो सलमानला इग्नोर करुन गर्लफ्रेंडसोबत पुढे जाताना दिसला. या व्हिडिओवरुन सलमान खानची सोशल मीडियावर खूप थट्टा झाली. अनेक मीम्स बनवण्यात आले. तसंच रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता तर भाईजान मात्र एकटाच मॅच बघत होता. 

 पण आता भाईजानच्या चाहत्यांनी शेअर केलेला फोटो पाहा. यामध्ये रोनाल्डो आणि सलमान खान हसत हसत एकमेकांशी गप्पा मारत आहेत. हा फोटो शेअर करत चाहत्यांनी सर्वांची बोलती बंद केली आहे. 

सलमान खानचा 'टायगर 3' १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच सिनेमात सलमान खानचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. शिवाय शाहरुख खानचा कॅमिओही खास आकर्षण असणार आहे. यंदाची दिवाळी सलमानच्या चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.

Web Title: Ronaldo ignored Salman Khan Bhaijaan s fans shared the photo and gave a bitter reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.