​ऋषी कपूर यांचा आणखी एक ‘ट्विटर बॉम्ब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 11:35 IST2016-06-28T06:05:25+5:302016-06-28T11:35:25+5:30

ऋषी कपूर सध्या मोठ्या पडद्यावर कमी आणि ट्विटरवर लोकांचे अधिक मनोरंजन करत आहेत. त्यांच्या खुमासदार शैलीत ते आसपासच्या घटनांवर, ...

Rishi Kapoor's another 'Twitter Bomb' | ​ऋषी कपूर यांचा आणखी एक ‘ट्विटर बॉम्ब’

​ऋषी कपूर यांचा आणखी एक ‘ट्विटर बॉम्ब’

ी कपूर सध्या मोठ्या पडद्यावर कमी आणि ट्विटरवर लोकांचे अधिक मनोरंजन करत आहेत.

त्यांच्या खुमासदार शैलीत ते आसपासच्या घटनांवर, सामाजिक परिस्थितीवर टीका करत असतात. मजेजीर ट्विट करण्यात तर त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. याचीच प्रचीती पुन्हा एकदा त्यांच्या लेटेस्ट ट्विटमुळे आली.

फॅशन ब्रँड ‘झारा’ला यावेळी त्यांच्या ‘ट्विटचे’धनी व्हावे लागले आहे. झाराच्या शोरू ममध्ये लागलेल्या सेलमधील काही कपडे फॅशनच्या नावाखाली म्हणजे फाटकेतुटके फडके आहेत की काय अशी शंका येते.

हीच शंका ऋषी कपूर यांनी बोलून दाखविली. ते लिहितात, झारामध्ये सेल चालू आहे. दोन कपडे घ्या आणी एक भिकेचा कटोरा मोफत मिळवा.

त्यांच्या या विनोदबुद्धीची प्रशंसा करण्यापासून करण जोहर स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने ट्विट केले की, ऋषीजी तुम्ही खरंच खूप भन्नाट आहात. ते कपडे कोणते हे तुम्ही स्वत:पाहून सांगा की, ऋषी कपूर बरोबर बोलले की नाही.

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Rishi Kapoor's another 'Twitter Bomb'