Video: रोना नही! सोनाक्षीच्या लग्नात रेखा भावुक; 'दबंग गर्ल'ने चुलबूल पांडेला मारली मिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 09:38 IST2024-07-11T09:37:49+5:302024-07-11T09:38:36+5:30

सोनाक्षीच्या लग्नातले सुंदर क्षण

Rekha was seen emotional at Sonakshi Sinha s wedding actress consoled her saying dont cry | Video: रोना नही! सोनाक्षीच्या लग्नात रेखा भावुक; 'दबंग गर्ल'ने चुलबूल पांडेला मारली मिठी

Video: रोना नही! सोनाक्षीच्या लग्नात रेखा भावुक; 'दबंग गर्ल'ने चुलबूल पांडेला मारली मिठी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal)  23 जुन रोजी लग्नबंधनात अडकली. दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नातील बरेच व्हिडिओ नंतर समोर आले. सलमान खान, रेखा, काजोल, तबू, अनिल कपूर, हुमा कुरेशीसह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती. नुकताच लग्नातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये अभिनेत्री रेखा (Rekha) खूप भावुक झाल्या आहेत तर सोनाक्षी त्यांना धीर देत आहे.

सोनाक्षी आणि जहीरने लग्नात पाहुण्यांसोबत डान्स एन्जॉय केला. सर्व पाहुण्यांनी दोघांना आशीर्वाद दिले. काजोलने त्यांच्यासोबत घेतलेला सेल्फी व्हायरल झाला. जहीरने अनिल कपूरसोबत त्याची सिग्नेचर स्टेपही केली. व्हिडिओत सोनाक्षी सलमान खानची गळाभेट घेतानाही दिसली. तर दुसरीकडे सोनाक्षीला नवरीच्या वेशात पाहून अभिनेत्री रेखा यांना अश्रू अनावर झाले होते. तेव्हा सोनाक्षी त्यांना 'रोना मत' असं म्हणत धीर देताना दिसत आहे. राजकुमार राव, सिद्धार्थ, आदिती राव हैदरी, साकीब सलेम असे सर्वच सेलिब्रिटी हनी सिंगच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 

सोनाक्षी आणि जहीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे.  'कोणताही शोऑफ नाही, बेस्ट वेडिंग पार्टी' अशी कमेंट करत नेटकऱ्याने अंबानी कुटुंबाला एकप्रकारे टोमणा मारला. जहीर आणि इकबालच्या वेडिंग व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. लग्नाआधी दोघांना खूप ट्रोल केलं गेलं मात्र आता त्यांचा साधेपणा नेटकऱ्यांना आवडला आहे. 

सोनाक्षी आणि जहीरने मुंबईतील राहत्या घरीच रजिस्टर मॅरेज केलं. यानंतर रात्री बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी त्यांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सर्व कलाकार सोनाक्षीच्या आनंदात सहभागी झाले होते.

Web Title: Rekha was seen emotional at Sonakshi Sinha s wedding actress consoled her saying dont cry