राशा थडानीच्या 'लईकी लइका'चं पोस्टर रिलीज, 'या' अभिनेत्यासोबत दिसणार सिझलिंग केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:06 IST2026-01-16T12:05:46+5:302026-01-16T12:06:15+5:30

लइकी-लइका म्हणजे काय माहितीये का?

rasha thadani and abhay varma next movie laikey laikaa posters released | राशा थडानीच्या 'लईकी लइका'चं पोस्टर रिलीज, 'या' अभिनेत्यासोबत दिसणार सिझलिंग केमिस्ट्री

राशा थडानीच्या 'लईकी लइका'चं पोस्टर रिलीज, 'या' अभिनेत्यासोबत दिसणार सिझलिंग केमिस्ट्री

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. रवीना टंडनची लेक राशा थडानी आधीपासूनच प्रसिद्धीझोतात होती. गेल्या वर्षी आलेल्या 'आजाद' सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं.  यामध्ये ती अजय देवगणचा पुतण्या युग देवगणसोबत झळकली होती. तर आता तिच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा झाली आहे. 'मुंज्या'फेम अभिनेता अभय वर्मासोबत ती आगामी 'लइकी लैला' सिनेमात दिसणार आहे. त्यांच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे.

'लइकी लइका' सिनेमाच्या पोस्टरमधूनच राशा आणि अभयची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. मेकर्सने सिनेमाचे काहीॉ पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'प्रेम, वेदना आणि विश्वास'. एका फोटोत राशा आणि अभय लिपलॉक करत आहेत. तर आणखी एका फोटोत दोघांचा इटेन्स लूक दिसत आहे. आणखी एकात त्यांचे रक्ताने माखलेले शूज आणि बॅकग्राऊंडला ग्रॅफिटी वॉल यामुळे ही कथा केवळ साधी लव्ह स्टोरी नसून त्यात ॲक्शन आणि ट्विस्ट असतील असा अंदाज वर्तवला जात आहे.


'लइकी लइका' हा चित्रपट या वर्षी उन्हाळ्यात रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सौरभ गुप्ता यांनी केले असून भावना दत्ता तलवार आणि राघव गुप्ता यांनी याची निर्मिती केली आहे. बिहारमध्ये 'लइकी लइका' हा शब्द मुलगा आणि मुलगी या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात काही प्रमाणात ग्रामीण किंवा विशिष्ट प्रादेशिक पार्श्वभूमी असू शकते. 'मुंज्या'च्या यशानंतर अभय वर्माला पुन्हा एकदा मोठ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

Web Title : राशा थडानी की 'लईकी लैला' का पोस्टर जारी, अभिनेता के साथ सिज़लिंग केमिस्ट्री

Web Summary : रवीना टंडन की बेटी राशा थडानी 'लईकी लैला' में अभय वर्मा के साथ हैं। पोस्टर में तीव्र केमिस्ट्री दिखती है, जो एक्शन और ट्विस्ट के साथ एक प्रेम कहानी का संकेत देती है। सौरभ गुप्ता द्वारा निर्देशित, यह इस गर्मी में रिलीज होने वाली है।

Web Title : Rasha Thadani's 'Laiki Laila' poster released, sizzling chemistry with actor

Web Summary : Raveena Tandon's daughter Rasha Thadani stars in 'Laiki Laila' with Abhay Verma. The poster reveals intense chemistry, hinting at a love story with action and twists. Directed by Saurabh Gupta, it's set to release this summer.