35 वर्ष पत्नीपासून विभक्त होते रणधीर कपूर; अभिनेत्याने सांगितलं वेगळं होण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:33 IST2026-04-28T09:32:38+5:302026-04-28T09:33:25+5:30
Randhir kapoor: रणधीर कपूर यांनी इतक्या वर्षानंतर वेगळं राहण्यामागचं कारण सांगितलं आहे.

35 वर्ष पत्नीपासून विभक्त होते रणधीर कपूर; अभिनेत्याने सांगितलं वेगळं होण्यामागचं कारण
बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणधीर कपूर. बॉलिवूडमध्ये रणधीर यांचे सिनेमा जितके गाजले तितकंच त्यांचं वैवाहिक आयुष्य सुद्धा चर्चिलं गेलं. अभिनेत्री करिश्मा आणि करीनाचे वडील असलेल्या रणधीर यांनी अभिनेत्री बबिता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. परंतु, गेली ३५ वर्ष हे दोघे पती-पत्नी विभक्त रहात होते. मात्र, इतक्या वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र नांदू लागली आहे. अलिकडेच अभिनेत्याने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बबिता यांच्यापासून विभक्त होण्यामागचं कारण सांगितलं.
रणधीर कपूर सोडून गेल्यानंतर बबिता यांनी एकटीनेच करीना आणि करिश्माचा सांभाळ केला. मात्र, ३५ वर्षानंतर रणधीर पुन्हा त्यांच्या पत्नीकडे परतले असून त्यांनी या विभक्त होण्याचा सगळा दोष स्वत:वर घेतला आहे. तसंच त्यांच्याकडून चूक झाली हेदेखील त्यांनी मान्य केलं.
''माझ्या आणि बबिताच्या वैवाहिक जीवनात ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्याची जबाबदारी मी घेतो. आज मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं, पूर्वी जे काही झालं ते फक्त घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळेच झालं. आम्ही कायदेशीररित्या कधीच वेगळे झालो नाही. बबिता माझी पत्नी आहे आणि कायम असेल. करिश्मा आणि करीना या सुद्धा माझ्याच लेकी आहेत. मी एक माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात. या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करत आहे. या सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे की, आता आम्ही सगळे एकत्र आहोत'', असं रणधीर कपूर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''मी खूप जास्त दारू पितो आणि रात्री घरी उशीरा येतो असं बबिता वाटायचं. माझं हे बेजबाबदार वागणं तिला आवडत नव्हतं. मी नीट वागावं, बदलावं असं तिला वाटायचं. पण, तिला जे अपेक्षित होते तसं माझ्या बाबतीत काही घडलं नाही. आणि, मी जसा आहे तसं मला स्वीकारणं तिला जमत नव्हतं.''
दरम्यान, १९६९ मध्ये बबिता आणि रणधीर कपूर यांची भेट झाली होती. त्यानंतर रणधीर यांनी दिग्दर्शित केलेल्या १९७१ मधील ''कल, आज और कल'' या सिनेमात या सिनेमात बबिता यांनी मुख्य भूमिका साकारली होती. याच सिनेमाच्या सेटवर या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. परंतु, लग्नानंतर काही वर्षांमध्येच ही जोडी स्वतंत्र राहू लागली. विशेष म्हणजे जवळपास ३५ वर्ष स्वतंत्र राहिल्यानंतर २०२३ मध्ये ही जोडी पुन्हा एकत्र आले