अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांची इच्छा नव्हती; आता ४५ व्या वर्षी 'ती' सिनेसृष्टी गाजवायला सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:13 IST2026-04-27T16:11:24+5:302026-04-27T16:13:17+5:30

अभिनेत्रीचा भाऊ, आई आणि बाबा हे तिघेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार आहेत. आता ती ४५ व्या वर्षी बॉलिवूड गाजवायला सज्ज आहे

Ranbir kapoor sister riddhima kapoor work in dadi ki shaadi movie at the age of 45 | अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांची इच्छा नव्हती; आता ४५ व्या वर्षी 'ती' सिनेसृष्टी गाजवायला सज्ज

अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांची इच्छा नव्हती; आता ४५ व्या वर्षी 'ती' सिनेसृष्टी गाजवायला सज्ज

बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याने स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. राज कपूर, ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांनी आपल्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इतकंच नव्हे आता कपूर कुटुंबाची पुढची पिढीची अभिनय क्षेत्र गाजवत आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरलाही अभिनेत्री बनायचे होते, पण तिने या क्षेत्रात करिअर केले नाही. तिची आई नीतू कपूर यांनी यामागचे एक कारण शेअर केले आहे, जे ऐकून चाहते चकीत झाले आहेत.

रिद्धिमाचे ओटीटी पदार्पण

रिद्धिमा कपूर सध्या तिच्या ओटीटी पदार्पणामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर तिचा 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाईव्ह्स' हा शो प्रदर्शित झाला आहे. कपूर कुटुंबाची मुलगी असूनही आणि इच्छा असूनही रिद्धिमा गेली अनेक वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. याबद्दल नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात खुलासा केला आहे. नीतू कपूर यांनी सांगितले की, रिद्धिमा एक उत्तम अभिनेत्री बनू शकली असती, पण तिने कधीही आपल्या स्वप्नांबद्दल उघडपणे भाष्य केले नाही.


"ते आत्महत्याच करतील..."

नीतू कपूर यांनी पुढे सांगितले की, रिद्धिमाला हे चांगले ठाऊक होते की तिच्या वडिलांची (ऋषी कपूर) तिने अभिनेत्री बनावे अशी मुळीच इच्छा नव्हती. म्हणूनच तिने कधीही या विषयाचा उल्लेख केला नाही. नीतू कपूर यांच्या मते, जर रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्यासमोर अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असते किंवा स्वतःचं आयुष्य संपवलं असतं. घरातील मुलींनी चित्रपटात काम करावं, अशी ऋषी कपूर यांची इच्छा नव्हती. 

आपल्या पत्नी आणि मुलांच्या बाबतीत ऋषी कपूर प्रचंड 'प्रोटेक्टिव्ह' होते. वडिलांचा स्वभाव रिद्धिमाला चांगल्या प्रकारे ठाऊक होता. त्यामुळे घरात कोणताही मतभेद नको, या उद्देशाने रिद्धिमाने दागिन्यांची डिझायनर बनण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिने डिझायनर बनण्याबद्दल वडिलांना सांगितले, तेव्हा ऋषी कपूर यांनी आनंदाने तिला शिक्षणासाठी लंडनला पाठवले. एकूणच यामुळे कपूर कुटुंबाची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आली. रिद्धिमा आता 'दादी की शादी' या सिनेमात झळकणार आहे.

Web Title : अदाकारा बनने का सपना अधूरा: 45 की उम्र में रिद्धिमा कपूर चमकेने को तैयार

Web Summary : रणबीर की बहन रिद्धिमा कपूर अभिनेत्री बनना चाहती थीं, लेकिन उनके पिता ऋषि कपूर ने इनकार कर दिया। उनकी तीव्र प्रतिक्रिया से डरकर, उन्होंने गहने डिजाइन करने का विकल्प चुना। अब, 45 साल की उम्र में, रिद्धिमा 'दादी की शादी' में शुरुआत करने के लिए तैयार हैं।

Web Title : Actress Dream Deferred: At 45, Riddhima Kapoor Ready to Shine

Web Summary : Riddhima Kapoor, Ranbir's sister, wanted to act but her father, Rishi Kapoor, disapproved. Fearful of his extreme reaction, she pursued jewelry design instead. Now, at 45, Riddhima is set to debut in 'Dadi Ki Shaadi', showcasing a new chapter in her life.