"तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर..."; 'राजा शिवाजी' पाहून राम गोपाल वर्मांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:09 IST2026-05-02T18:57:25+5:302026-05-02T19:09:49+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'राजा शिवाजी' पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले?

Ram Gopal Varma's post after watching 'Raja Shivaji' riteish deshmukh genelia deshmukh | "तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर..."; 'राजा शिवाजी' पाहून राम गोपाल वर्मांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

"तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर..."; 'राजा शिवाजी' पाहून राम गोपाल वर्मांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

रितेश देशमुखची महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक सिनेमा 'राजा शिवाजी' १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे. रितेश देशमुखने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि मुख्य भूमिका साकारली असून, प्रेक्षक व समीक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'राजा शिवाजी' पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

राम गोपाल वर्मा यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही या चित्रपटाचे आणि रितेशच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी 'X' वर त्यांनी लिहिले की, "हे जेनेलिया, तुमचा चित्रपट 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन! रितेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही रूपांत चित्रपटगृहात धुमाकुळ गाजवत आहे. रितेशला पाहणं म्हणजे मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय.'', अशी पोस्ट राम गोपाल वर्मांनी केली आहे. 




'राजा शिवाजी' सिनेमाविषयी

‘राजा शिवाजी’  या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया  देशमुख आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. 

'राजा शिवाजी'ची कमाई

सैकनिल्कच्या अहवालानुसार 'राजा शिवाजी' सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल १२. ४० कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १२.४० कोटींची कमाई करत कोणत्याही मराठी सिनेमासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे नोंदवला आहे. त्याचबरोबर, हा चित्रपट २०२६ मधील सर्व चित्रपटांमध्ये तिसरा सर्वाधिक ओपनिंग डे ठरला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण 'राजा शिवाजी' सिनेमा थिएटरमध्ये पाहायला जात आहेत.

Web Title : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस पर छाया; राम गोपाल वर्मा ने की प्रशंसा।

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' ने बॉक्स ऑफिस पर धूम मचा दी। राम गोपाल वर्मा ने रितेश के निर्देशन और अभिनय की प्रशंसा करते हुए इसे शिवाजी महाराज का पुनर्जन्म बताया। फिल्म में संजय दत्त, अभिषेक बच्चन और विद्या बालन भी हैं। पहले दिन फिल्म ने ₹12.40 करोड़ कमाए।

Web Title : 'Raja Shivaji' rocks box office; Ram Gopal Varma praises Ritesh.

Web Summary : Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji' roared at the box office. Ram Gopal Varma praised Ritesh's direction and acting, calling it Shivaji Maharaj's rebirth on screen. The film stars Sanjay Dutt, Abhishek Bachchan, and Vidya Balan. It earned ₹12.40 crore on its opening day.