रणवीर सिंगनंतर अमेरिकेत राहणाऱ्या प्रियंका चोप्राने मुंबईतील दोन घरं विकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 12:44 PM2023-11-18T12:44:50+5:302023-11-18T12:47:48+5:30

प्रियंकाने मुंबईतील तिचे दोन अपार्टमेंट दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक चौबे यांना विकले आहेत.

Priyanka chopra sells mumbai house to director abhishek chaubey worth 6 crore | रणवीर सिंगनंतर अमेरिकेत राहणाऱ्या प्रियंका चोप्राने मुंबईतील दोन घरं विकली

रणवीर सिंगनंतर अमेरिकेत राहणाऱ्या प्रियंका चोप्राने मुंबईतील दोन घरं विकली

प्रियंका चोप्राने बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केल्यानंतर, प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली. प्रियंका निक आणि मुलगी मालतीसह तिथंच राहते. मीडियारिपोर्टनुसार,  प्रियंकाने मुंबईतील अंधेरी येथील तिचे दोन अपार्टमेंट दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक चौबे यांना विकले आहेत. त्यासाठी त्यांनी एकूण सहा कोटी रुपये घेतले आहेत.

प्रियंका चोप्राचे हे घर लोखंडवाला येथील करण अपार्टमेंटमध्ये आहे. ९ व्या मजल्यावर असलेले हे घरं 2,300 स्क्वेअर फूटांचं आहे. प्रियंकाची आई मधू चोप्रा यांच्या मदतीने 23 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी हा व्यवहार झाला. यासाठी १२ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. याआधी, प्रियंकाने लोखंडवाला येथील एक मालमत्ता 7 कोटी रुपयांना एका डॉक्टरला विकली होती, ज्यांनी 2021 मध्ये ती जागा भाड्याने घेतली होती.

याआधी अभिनेता रणवीर सिंगनेही गेल्या आठवड्यात मुंबईत मोठी प्रॉपर्टी डील केली होती. त्याने मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेले दोन अपार्टमेंट विकले होते. या दोघांची किंमत 15.25 कोटी रुपये आहे. याआधी प्रियंकाने २०२१ मध्ये मुंबईतल्या वर्सोवामधील तिचे दोन आलिशान फ्लॅट विकले होते. 

Web Title: Priyanka chopra sells mumbai house to director abhishek chaubey worth 6 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.