प्रिती झिंटाचं दमदार कमबॅक! कुणाल खेमूच्या Vibe चित्रपटात झळकणार, रिलीज डेटही जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:47 IST2026-05-19T16:42:53+5:302026-05-19T16:47:56+5:30
ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली कुणाल खेमू आणि चिराग निहलानी निर्मित VIBE या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, प्रिती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

प्रिती झिंटाचं दमदार कमबॅक! कुणाल खेमूच्या Vibe चित्रपटात झळकणार, रिलीज डेटही जाहीर
ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली कुणाल खेमू आणि चिराग निहलानी निर्मित VIBE या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, प्रिती जी. झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. VIBE ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे, ज्यांचे आयुष्य अचानक पूर्णपणे बदलून जाते, जेव्हा ते नकळत एका धोकादायक परिस्थितीत अडकतात, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते.
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज आपल्या हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपट VIBE ची थिएटर रिलीज डेट १८ सप्टेंबर जाहीर केली. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कुणाल खेमू यांनी केले आहे. चित्रपटात कुणाल स्वतः झळकणार असून त्याच्यासोबत प्रिती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि प्रथमच पदार्पण करणारी वंशिका धीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
VIBE ची कथा दोन जिवलग मित्रांच्या आयुष्याभोवती फिरते. या मित्रांचं साधं आणि शांत आयुष्य अचानक एका अनपेक्षित वळणावर बदलतं. हा प्रवास त्यांच्या मैत्रीची कठीण परीक्षा घेतो. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजचा VIBE हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रिती झिंटाला या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुत आहेत.