'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:14 AM2023-06-29T11:14:06+5:302023-06-29T11:19:10+5:30

Pooja bhatt:बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे.

pooja bhatt revealed alia mother soni razdan was guilty marrying mahesh bhatt | 'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा भट्ट (pooja bhatt) सध्या बिग बॉस ओटीटी (Bigg boss OTT) मध्ये दिसून येत आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून पूजाने तिच्या प्रोफेशनलसह पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये तिने वडील महेश भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे. महेश भट्ट यांना सोनी राजदानसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होत असल्याचं तिने म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत पूजाने याविषयी सांगितलं आहे.

बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिने सोनी राजदान (soni razdan)- महेश भट्ट यांच्याविषयी भाष्य केलं. महेश भट्ट यांच्या अफेअर्स आणि २ लग्न यांची त्याकाळी प्रचंड चर्चा रंगली. किंबहुना आजदेखील ही चर्चा पाहायला मिळते. लग्न झालेलं असतानाही महेश भट्ट (mahesh bhatt) परवीन बाबीच्या (parveen babi) प्रेमात पडले. मात्र, याच काळात त्यांच्या आयुष्यात सोनी राजदान आली आणि त्यांनी लग्न केलं असं म्हटलं जातं. 

"मी अशा वडिलांसोबत मोठी झाले ज्यांनी एका दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केलं आणि दुसरा संसार थाटला. एकदा आम्ही कुन्नूरला जात होतो आणि त्या (सोनी राजदान) बाहेर बसल्या होत्या. त्यांनी मला पाहिलं आणि तुझ्याशी बोलायचंय असं सांगितलं. पूजा,मला खूप अपराधी वाटतं", असं त्या मला म्हणाल्या.

पुढे ती म्हणते, "त्यांचं बोलणं ऐकल्यावर मी त्यांना समजावून सांगितलं. तुम्हाला पश्चाताप करण्याची किंवा अपराधी वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. कारण, तुम्ही कोणाचं लग्न मोडलेलं नाही." दरम्यान, पूजाच्या या मुलाखतीला आता बरीच वर्ष उलटून गेली आहेत. पूजा आणि सोनी यांच्यात आता चांगलं नातं आहे. इतकंच कशाला आलिया आणि पूजा सावत्र बहिणी असूनही त्या सख्या बहिणींप्रमाणेच राहतात. महेश आणि सोनी यांनी आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.
 

Web Title: pooja bhatt revealed alia mother soni razdan was guilty marrying mahesh bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.