​मुलींच्या बाबतीत लोकांचे दुटप्पी धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:14 IST2016-09-10T15:44:03+5:302016-09-10T21:14:03+5:30

आपल्या देशात महिला-मुलींच्या बाबतील लोक दुटप्पी धोरण बाळगतात. वरवर ‘बेटी घरी की लक्ष्मी’ म्हणायचे आणि दुसरीकडे तिला शिक्षण किंवा ...

People's tilt policy in case of girls | ​मुलींच्या बाबतीत लोकांचे दुटप्पी धोरण

​मुलींच्या बाबतीत लोकांचे दुटप्पी धोरण

ल्या देशात महिला-मुलींच्या बाबतील लोक दुटप्पी धोरण बाळगतात. वरवर ‘बेटी घरी की लक्ष्मी’ म्हणायचे आणि दुसरीकडे तिला शिक्षण किंवा प्रगतीपासून दूर ठेवायचे. मुलांसाठी एक आणि मुलींसाठी वेगळा नियम असा ‘डलब स्टँडर्ड’ दृष्टीकोन जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत खरी समानता येणार नाही, असं परखड मत आहे अभिनेत्री रिचा चढ्ढाचे.

ती ‘जेंडर बेस्ड व्हॉयलेंस इन इंडिया’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती म्हणाली, मुख्य म्हणजे पुरुषांना लहानपणापासूनच मुलींशी कसे वागावे याचे शिक्षण द्यायला हवे. गर्भावस्थेपासून मुली असुरक्षित असतात. त्यांना विश्वास द्यायला हवा की त्या मुक्तपणे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. तरच महिलांविरोधात होणार हिंसाचार थांबू शकतो.

देशातील महिलांची स्थिती कशी आहे, ती सुधारण्यासाठी काय केले जाऊ शकते याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या पॅनलमध्ये रिचा बोलत होती.

Web Title: People's tilt policy in case of girls