पापाराझींच्या घाणेरड्या नजरेवर भडकली नोरा फतेही, म्हणाली- "फोटो झूम करुन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:24 IST2024-04-23T14:24:12+5:302024-04-23T14:24:59+5:30

'पापाराझी कल्चर' दिवसेंदिवस फोफावत चाललंय?

Nora Fatehi got angry at the dirty photography of paparazzi questions why to zoom on body parts | पापाराझींच्या घाणेरड्या नजरेवर भडकली नोरा फतेही, म्हणाली- "फोटो झूम करुन..."

पापाराझींच्या घाणेरड्या नजरेवर भडकली नोरा फतेही, म्हणाली- "फोटो झूम करुन..."

गेल्या काही वर्षांपासून 'पापाराझी' (Paparazzi) कल्चर फार वाढलंय. कलाकारांचे, तारेतारकांचे फोटो घेणाऱ्या फोटोग्राफर्सना आता पापाराझी हे आधुनिक गोंडस नाव मिळालं आहे. पण त्यांच्यामुळे कलाकारांचं आयुष्य आधीपेक्षा जास्त सार्वजनिक झालंय. एअरपोर्ट, जिम, हॉटेल/कॅफे, सलून/पार्लर, थिएटर, ऑफिस अशा सगळ्याच ठिकाणी आता पापाराझी पोहोचले आहेत. याचा कलाकारांना अनेकदा त्रासही होतो. शिवाय पापाराझी फोटो/व्हिडिओ काढताना अभिनेत्रींच्या बॉडी पार्ट्सवर चुकीच्या ठिकाणी झूम करतात. यावर अनेक अभिनेत्रींनी राग व्यक्त केला आहे. नुकतंच नोरा फतेहीने (Nora Fatehi) पापाराझींवर निशाणा साधला.

नोरा फतेही सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवाय ती उत्तम डान्सर  आहे. न्यूज 18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत नोरा म्हणाली, "मला वाटतं पापाराझींनी याआधी कधी अशी सुंदर पाठ पाहिली नाही. हे असंच आहे. ते फक्त माझ्यासोबत नाही तर इतर अभिनेत्रींसोबतही हेच करतात. कदाचित ते त्यांच्या पाठीवर झूम करत नाहीत कारण त्यांना तेवढं एक्सायटिंग वाटत नसेल. मात्र अन्य बॉडी पार्ट्सवर ते झूम करतात. कधी कधी झूम करण्यासारखं काहीच नसतं मग तेव्हा नक्की ते कशावर फोकस करतात?"

ती पुढे म्हणाली, "नशिबाने माझी चांगली बॉडी आहे फिट आहे आणि मला माझ्या असेट्सवर गर्व आहे. मला अजिबातच याची लाज वाटत नाही."

नोराच्या आधी अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही पापाराझींच्या अशा वागण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. एका अवॉर्ड शोमध्ये तिने रेड कार्पेटवर पापाराझींनी तिला बॅक पोज देण्यास सांगितले तेव्हा तिने पापाराझींची बोलती बंद केली होती. तसंच श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनेही मागून शॉट्स घेऊ नका अशी विनंती केली होती.

Web Title: Nora Fatehi got angry at the dirty photography of paparazzi questions why to zoom on body parts