/>होय..आम्ही बोलतोय, ते ‘तेरे नाम’मधील ‘निर्जरा’ अर्थात भूमिका चावलाबद्दल. भूमिकाचा भोळा चेहरा आणि साधेपणा अनेक चाहत्यांना भावला होता. मात्र असे असूनही भूमिका बॉलिवूडमध्ये फार नाव मिळवू शकली नाही. २००७ मध्ये ती अखेरची ‘गांधी माय फादर’ या चित्रपटात दिसली आणि बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. याचवर्षी तिने तिचा बॉयफ्रेन्ड योगगुरु भारत ठाकूर याच्याशी लग्नही केले. यानंतर २०१४ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. पण आता भूमिका पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. होय, भूमिकाची मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह यू आलिया’ कन्नडमध्ये रिलीज झाला. हाच चित्रपट आता हिंदीत रिलीज होतोय. यानंतर भूमिका महेंद्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातही झळकणार आहे. ‘लव्ह यू आलिया’मध्ये सनी लिओनी हिचे आयटम साँगही आहे. साहजिकच या चित्रपटाकडून भूमिकाला बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षा किती खºया ठरतात, ते बघूच!!