'मुन्नाभाई एमबीबीएस' ची डॉक्टर सुमन आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:35 IST2024-03-13T13:34:43+5:302024-03-13T13:35:49+5:30

मुन्नाभाई आणि लगान सिनेमांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. ती अभिनेत्रीसोबतच प्रोफेशनल डान्सरही आहे.

Munnabhai Mbbs actress Gracy singh latest photo fans couldnt recognise her | 'मुन्नाभाई एमबीबीएस' ची डॉक्टर सुमन आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना

'मुन्नाभाई एमबीबीएस' ची डॉक्टर सुमन आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना

'मु्न्नाभाई एमबीबीएस' फेम चिंकी म्हणजे अभिनेत्री ग्रेसी सिंह (Gracy Singh) आठवतेय का? आमिर खानचा 'लगान' असो किंवा संजय दत्तचा मुन्नाभाई, ग्रेसीने या अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून भूमिका साकारली आणि लोकप्रियता मिळवली. तिचं गोड हसू, सौंदर्य यावर प्रेक्षक फिदा झाले होते. मुन्नाभाईमध्ये तिने डॉक्टर सुमनची भूमिका साकारली होती. तीच ग्रेसी सिंह आता कशी दिसते? सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तपकिरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो ग्रेसी सिंहने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखंच गोड हसू आहे. ग्रेसी सोशल मीडियावर सक्रीय असते. 1988 साली तिने 'सर उठा कर जियो' मधून करिअरला सुरुवात केली होती. ग्रेसीने पंजाबी, मल्याळम, कन्नड, मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मुन्नाभाई आणि लगान सिनेमांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. ती अभिनेत्रीसोबतच प्रोफेशनल डान्सरही आहे. 'लगान'मधील तिच्या 'राधा कैसे ना जले' गाण्यावर आजही लोक थिरकतात.

ग्रेसीने टीव्ही इंडस्ट्रीतही काम केले आहे. १९९७ साली तिने 'अमानत' मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली होती. सध्या ग्रेसी पडद्यावरुन गायब आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

Web Title: Munnabhai Mbbs actress Gracy singh latest photo fans couldnt recognise her