'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:48 IST2024-07-02T15:47:27+5:302024-07-02T15:48:33+5:30

सुपरहिट झालेल्या 'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा ओटीटीवर या तारखेला रिलीज होणार आहे (munjya, aditya sarpotdar)

munjya movie fame director aditya sarpotdar new movie kakuda starring riteish deshmukh sonakshi sinha | 'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत

'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत

रिलीज होऊन अनेक दिवस झाले तरीही बॉलिवूडमध्ये एका सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा म्हणजे 'मुंज्या'. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंज्या'चं दिग्दर्शन केलंय. आदित्यच्या दिग्दर्शनाचं चांगलंच कौतुक होतंय. 'मुंज्या' सुपरहिट होताच आदित्यच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. हा सुद्धा एक हिंदी सिनेमा असून रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा

आदित्य सरपोतदारने दिग्दर्शक म्हणून 'मुंज्या' सिनेमात चमकदार कामगिरी केली. अशातच आदित्यच्या नव्या हिंदी सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमाचं नाव 'काकूदा'. पोस्टरवर नजर मारल्यास हा सिनेमा सुद्धा रहस्यमयी कॉमेडी सिनेमा वाटतोय. सिनेमाच्या पोस्टरवर रितेश देशमुख, सोनाक्षी  सिन्हा, सकीब सलीम हे तीन कलाकार दिसत आहेत. याशिवाय मागे एका माणसाची भयावह सावली दिसतेय. 

'काकूदा' कधी आणि कुठे बघाल?

'मुंज्या' नंतर आदित्यचा नवीन हॉरर सिनेमा 'काकूदा' ओटीटीवर रिलीज होणार आहे. १२ जुलै संध्याकाळी सात वाजता हा सिनेमा झी 5 वर पाहायला मिळेल. रोनी स्क्रूवाला यांनी 'काकूदा' सिनेमाची निर्मिती केलीय. विशेष गोष्ट म्हणजे सोनाक्षी सिन्हाने नुकतंच जहीर इक्बालसोबत लग्न केलं. लग्नानंतर रिलीज होणारा सोनाक्षीचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. याशिवाय 'मुंज्या' फेम आदित्य सरपोतदार या सिनेमातून कोणती चमकदार कामगिरी करतो, हे पहावं लागेल.

Web Title: munjya movie fame director aditya sarpotdar new movie kakuda starring riteish deshmukh sonakshi sinha