"एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून...", 'मुंज्या' सिनेमा बघितल्यानंतर भारावल्या गार्गी फुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:29 IST2024-06-11T12:26:25+5:302024-06-11T12:29:46+5:30

गार्गी फुलेंनी नुकताच 'मुंज्या' हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्या भारावून गेल्या आहेत. 'मुंज्या' सिनेमासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

marathi actress gargi phule shared post for bollywood horror munjya movie | "एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून...", 'मुंज्या' सिनेमा बघितल्यानंतर भारावल्या गार्गी फुले

"एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून...", 'मुंज्या' सिनेमा बघितल्यानंतर भारावल्या गार्गी फुले

'मुंज्या' हा हॉरर कॉमेडी हिंदी सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. अखेर शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हटके स्टोरी आणि उत्तम क्लायमॅक्स असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केलं आहे. मराठी दिग्दर्शकाच्या या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेत्री गार्गी फुले यांनीही मुंज्या सिनेमासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

सु्प्रसिद्ध दिवंगत अभिनेता निळू फुले यांची लेक गार्गी फुलेदेखील अभिनेत्री आहेत. गार्गी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. गार्गी फुलेंनी नुकताच 'मुंज्या' हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्या भारावून गेल्या आहेत. 'मुंज्या' सिनेमासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. "कमाल फिल्म...खूप मज्जा आली बघायला....पण ही फिल्म थिएटरमध्येच जाऊन बघा. त्याची गंमत मोठ्या पडद्यावरच आहे. एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून खूप बरं वाटलं आणि मुळात सगळ्यांनी उत्तम कामं केली आहेत. नक्की बघा...मुंज्या", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'मुंज्या' सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात बालकलाकार आयुष उलगडे याने मुंज्याची भूमिका साकारली आहे. 'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून 'मुंज्या' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

'मुंज्या' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा पाहायला मिळत आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास ४ कोटींची कमाई केली होती. पण, दुसऱ्याच दिवशी 'मुंज्या' सिनेमाने कमाईच्या बाबतीत मुसंडी मारली आहे. दुसऱ्या दिवशी 'मुंज्या' सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे. शनिवारी या सिनेमाने तब्बल ७.२५ कोटींचा बिजनेस केला आहे. अवघ्या चार दिवसांत मुंज्या सिनेमाने २३.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: marathi actress gargi phule shared post for bollywood horror munjya movie