मनोज वाजपेयींच्या चाहत्यांसाठी खुशखबर, बहुप्रतिक्षित 'जोरम' चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:47 PM2023-11-08T13:47:10+5:302023-11-08T13:50:51+5:30

सर्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये डंका गाजवणाऱ्या 'जोरम' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

Manoj Vajpayee movie 'Joram' to release date out | मनोज वाजपेयींच्या चाहत्यांसाठी खुशखबर, बहुप्रतिक्षित 'जोरम' चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

मनोज वाजपेयींच्या चाहत्यांसाठी खुशखबर, बहुप्रतिक्षित 'जोरम' चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

बॉलिववूडमध्ये असेही काही तगडे कलाकार आहेत, ज्यांनी स्वबळावर आपलं नाव कमावलं आहे. यातीलच एक हरहुन्नरी प्रतिभावंत कलाकार मनोज वाजपेयी.  राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या अभिनेत्यानं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत वेगळी छाप सोडली आहे. सध्या मनोज वाजपेयी हे त्यांच्या 'जोरम' चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये डंका गाजवणाऱ्या 'जोरम' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

मनोज बाजपेयी यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मनोज यांनी 'जोरम'चा एक मोशन व्हिडीओ शेअर केला आणि चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेबद्दल माहिती दिली. 'जोरम' हा 8 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. देवाशिष मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट एक सायकोथ्रिलर असण्याचे सांगण्यात येत आहे. 

'जोरम' सिनेमाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालं. बुसान फिल्म फेस्टिव्हल, सिडनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डर्बन फिल्म फेस्टिव्हल आणि एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'जोरम'चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.

बॉक्स ऑफिसवर बी-टाऊन सुपरस्टार कतरिना कैफच्या सिनेमासोबत 'जोरम'ची टक्कर होणार आहे. कतरिना कैफ आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 8 डिसेंबरला रिलीज होणार आहे.  अशा परिस्थितीत या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Manoj Vajpayee movie 'Joram' to release date out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.