​बाबूल सुप्रीयो यांच्या आवाजात ऐका : ‘खोया हू मैं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 20:35 IST2016-05-02T15:04:14+5:302016-05-02T20:35:27+5:30

व्हिनस वर्ल्डवाईड एन्टटेन्मेंटने नुकतेच ‘खोया हू मैं’ हे न्यू सिंगल लाँन्च केले. अभिनेते, गायक आणि केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो ...

Listen to the voice of Babul Supriyo: 'I am lost' | ​बाबूल सुप्रीयो यांच्या आवाजात ऐका : ‘खोया हू मैं’

​बाबूल सुप्रीयो यांच्या आवाजात ऐका : ‘खोया हू मैं’

हिनस वर्ल्डवाईड एन्टटेन्मेंटने नुकतेच ‘खोया हू मैं’ हे न्यू सिंगल लाँन्च केले. अभिनेते, गायक आणि केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो यांनी ‘खोया हूं मैं’  गायले आहे. या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटला बाबुल सुप्रीयो आपल्या मुलीसह हजर होते. याशिवाय अनील मुरका, निखिल घई, शगुन गुप्ता, लॉवेल अरोरा, अजॉय अरोरा, श्वेता खंडूरी, सेजल मंदाविया, राम शंकर, रश्मी पित्रे, स्मिता गोंडकर, गिरीश जैन, लिजा मलिक, शोमू मित्रा आदींही उपस्थित होते. ज्योती सक्सेना हिच्यासह चित्रीत करणारे हे गाणे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारे आहे. बाबुल सुप्रीयो यांच्या आवाजातील गाणे ऐकून प्रेक्षक निश्चितपणे मंत्रमुग्ध होतील, असा दावा व्हिनसचे डायरेक्टर चंपक जैन यांनी यावेळी केला. हे गाणे म्हणजे स्वरमाधूर्य आणि शृंगार यांचा सुरेख मेळ असल्याचे बाबुल सुप्रीयो यावेळी म्हणाले. गीतकार शाहीन इक्बाल यांच्या या गीताला संजीव श्रीवास्तव यांनी संगीत दिले आहे. अजॉय व लॉवेल यांनी चित्रीकरण केले आहे.

Web Title: Listen to the voice of Babul Supriyo: 'I am lost'