"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:09 IST2026-05-16T13:06:51+5:302026-05-16T13:09:08+5:30

अभिनेत्री कियारा अडवाणीने अलीकडेच तिची मुलगी सराय्या (Saraayah) मोठी झाल्यावर तिला प्रेमाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल कोणता सल्ला द्यायला आवडेल, यावर जाहीरपणे भाष्य केले आहे.

kiara advani talk that her daughter shouldn't date just one guy, except when getting married | "तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला

"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला

अभिनेत्री कियारा अडवाणीने अलीकडेच तिची मुलगी सराय्या (Saraayah) मोठी झाल्यावर तिला प्रेमाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल कोणता सल्ला द्यायला आवडेल, यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. कियाराने सांगितले की, तिच्या मुलीने केवळ एकाच व्यक्तीला डेट करावे आणि त्याच व्यक्तीशी लग्न करावे, असे कोणतेही बंधन ती आपल्या मुलीवर घालणार नाही. मुलीने तिचे आयुष्य भरभरून जगावे अशी तिची इच्छा आहे, अगदी तिच्या मुलीला लग्न करायचे नसले तरीही ती तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देईल.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कियारा अडवाणी म्हणाली, "माझ्या मुलीने तिचे आयुष्य पूर्णपणे जगावे अशी माझी इच्छा आहे. तिने फक्त एकाच मुलाला डेट करु नये. याशिवाय ज्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे त्याच्याशीच तिने लग्न केलेच पाहिजे, असे कोणतेही दडपण तिच्यावर नसेल. तिला लग्न करायचे असेल तर तिने करावे, आणि नसेल करायचे तर करू नये." कियाराने पुढे हसतमुखपणे सांगितले की, तिच्या आयुष्यात तिने ज्यांना ज्यांना डेट केले, त्या प्रत्येकाशीच ती लग्न करणार असे तिला वाटायचे.

आपल्या जुन्या नात्यांबद्दल बोलताना ती म्हणाली, "आयुष्य आपण विचार करतो तसे घडत नाही. पण देवाचे आभार की कारण त्याने शेवटी माझ्यासाठी जो जीवनसाथी (सिद्धार्थ मल्होत्रा) निवडला आहे, त्यासोबत मी खूप आनंदी आहे. परंतु, तुमच्या वाढत्या वयात येणारी प्रत्येक नाती तुम्हाला काहीतरी शिकवून जातात आणि त्याच अनुभवांमुळे तुम्ही आज एक व्यक्ती म्हणून घडता."

आपल्या मुलीला देणाऱ्या सल्ल्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, "मी सराय्याला सांगेन की आयुष्य स्वतः अनुभवणे, तुम्हाला काय हवे आहे आणि काय नको आहे हे ठरवणे पूर्णपणे योग्य आहे. या प्रवासात तुमच्याकडून चुकाही होतील. काही वेळा घेतलेले निर्णय नंतर चुकीचे वाटू शकतात, पण त्या चुकांमधून तुम्ही काय शिकता आणि कसे पुढे जाता हे महत्त्वाचे असते."

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी १५ जुलै २०२५ रोजी त्यांच्या लाडक्या मुलीचे, सराय्याचे स्वागत केले होते. त्यांनी अजूनही मुलीचा चेहरा जगासमोर आणला नसला, तरी ते अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. नुकताच कियाराने तिचा आई म्हणून पहिला 'मदर्स डे' साजरा केला, ज्यानिमित्त सिद्धार्थने तिला पॅनकेक्स बनवून एक सुंदर सरप्राईज दिले होते.

Web Title: kiara advani talk that her daughter shouldn't date just one guy, except when getting married