कंगणा राणौतने मनालीत घेतला आलिशान बंगला, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 20:04 IST2018-01-06T14:34:22+5:302018-01-06T20:04:22+5:30

अभिनेत्री कंगणा राणौत ही चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत असते. कारण इंडस्ट्रीमधील कुठल्याही वादावर कंगणाची प्रतिक्रिया अपेक्षित असतेच. असो, ...

Kangana Ranaut took Manali to the elite bungalow, see photo! | कंगणा राणौतने मनालीत घेतला आलिशान बंगला, पाहा फोटो!

कंगणा राणौतने मनालीत घेतला आलिशान बंगला, पाहा फोटो!

िनेत्री कंगणा राणौत ही चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत असते. कारण इंडस्ट्रीमधील कुठल्याही वादावर कंगणाची प्रतिक्रिया अपेक्षित असतेच. असो, आता कंगणा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, कंगणाने नव्या वर्षात स्वत:लाच एक सुंदरसे गिफ्ट दिले आहे. तिने गृहनगर हिमाचलमधील मनालीमध्ये एक सुंदर बंगला खरेदी केला असून, तिच्या या बंगल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नवत वाटणारा हा बंगला खूपच आलिशान आहे.



खरं तर कंगणाने २०१६ मध्येच या बंगल्याबाबतचे संकेत दिले होते. त्यावेळी तिने म्हटले होते की, ‘मी पुन्हा गृहनगरला जाऊ इच्छिते. आपल्या मूळ गावी काम करू इच्छिते.’ तेव्हाच अंदाज लावला जात होता की, कंगणा मनालीत आपला आशियाना शोधत असावी. आता कंगणा आपल्या मूळ गावी काय काम करणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, कंगणाच्या फॅन क्लबने तिच्या या सुंदर बंगल्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. डोंगर-दºयांच्या कुशीत दिसत असलेला हा बंगला खूपच आलिशान आहे. 



दरम्यान, गेल्यावर्षी कंगणाच्या मुंबई येथील घराचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कारण कंगणाचे हे घर फंकी स्टाईलने सजविले होते. आता पुन्हा एकदा तिच्या मनालीतील घराचे फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, कंगणा सध्या तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे लेखन बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या लेखकाने केले आहे. चित्रपटातील कंगणाचा लूक समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच  डॅशिंग अंदाजात दिसत आहे.  

Web Title: Kangana Ranaut took Manali to the elite bungalow, see photo!