'तनु वेड्स मनु'च्या सिक्वलमधून कंगाना राणौतला डच्चू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:14 IST2018-01-03T08:29:52+5:302018-01-03T14:14:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगाना राणौत गेल्या संपूर्ण वर्षात आपल्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त विधानांमुळे जास्त चर्चेत राहिली. कंगनाच्या वायफळ बडबडीमुळे अनेक लोक ...

Kangana dropped out of Ranaut from 'Sunu Weds Manu' sequel? | 'तनु वेड्स मनु'च्या सिक्वलमधून कंगाना राणौतला डच्चू?

'तनु वेड्स मनु'च्या सिक्वलमधून कंगाना राणौतला डच्चू?

लिवूड अभिनेत्री कंगाना राणौत गेल्या संपूर्ण वर्षात आपल्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त विधानांमुळे जास्त चर्चेत राहिली. कंगनाच्या वायफळ बडबडीमुळे अनेक लोक तिच्या विरोधात सुद्धा गेली आहेत..ज्या चित्रपटासाठा कंगनाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते त्याच्या सिक्वलमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 
दिग्दर्शक आनंद एल राय यांना तनु वेड्स मनुच्या तिसऱ्या भागाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे तनु वेड्स मनुच्या तिसऱ्या भागासाठी कोणती कथा नाही आहे. जशी आम्हाला या चित्रपटासाठी कथा मिळेल आम्ही चित्रपटाच्या तयारीला लागू. 

तनु वेड्स मनुच्या पहिल्या दोनही सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत कंगना दिसली होती. तिसऱ्या सिरीजमध्ये ही कंगनाला कास्ट केले जाणार का हा प्रश्न आनंद एल राय यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की, आधी चित्रपटाची कथा फायनल करण्यात येऊ देत मग आम्ही अभिनेत्रीच्या बाबतीत विचार करु, चित्रपटाच्या कथेनुसार अभिनेत्रीचे नाव फायनल करण्यात येईल. सगळ्या कलाकारांची निवड चित्रपटाच्या कथे अनुसारच केली जाईल.   

ALSO READ :  OMG! ​सलमान खानला मिळाली कंगना राणौतचा सूड उगवण्याची आयती संधी!!

याआधी ही आनंद यांच्याकडे तनु वेड्स मनुसाठी कंगनाशिवाय कोणतेच नाव नव्हते. पहिल्यांदा त्यांनी या चित्रपटासाठी कथेवरुन अभिनेत्रीची निवड केले जाण्याचे वक्तव्य केले.  एकवेळ अशी होती की आनंद कंगनाची नेहमीच स्तुती करायचे. कंगनावर त्यांना अभिमान असल्याचे सांगायचे.  

मिळालेल्या माहितीनुसार कंगना आणि आनंद यांचे संबंध 'तनु वेड्स मनु2' च्या शूटिंग दरम्यानच बिघडले होते. कंगनाची मनमानी बघून तनु वेड्स मनुच्या तिसऱ्या भागात तिला न घेण्याचा निर्णय आनंद यांनी तेव्हाच घेतला होता. यानंतर बोलताना आनंद म्हणाला होते की, ''माझ्यात आणि कंगनात चांगली मैत्री आहे मात्र शूटिंग दरम्यान आमचं ट्युनिंग फारसं चांगलं नसतं.       
कंगना याआधी करण जोहर, सैफ अली खान आणि ऋतिक रोशन यांच्याशी पंगा घेतला आहे. मात्र हा पंगा कंगनाला चांगलाच महागात पडला. गतवर्षी रिलीज झालेले कंगनाचे ‘सिमरन’ आणि ‘रंगून’ दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. 

Web Title: Kangana dropped out of Ranaut from 'Sunu Weds Manu' sequel?