तब्बल 29 वर्षानंतर काजोलने मोडला नो किसिंग रुल; 'या' अभिनेत्यासोबत केलं लीपलॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:46 AM2023-07-15T10:46:24+5:302023-07-15T10:49:21+5:30

'द ट्रायल' या वेब सीरिजसाठी काजोलनं तिच्या करिअरमधील नो किसिंग पॉलिसी मोडली आहे.

kajol kissed alyy khan on screen for the first time in debut web series the trial | तब्बल 29 वर्षानंतर काजोलने मोडला नो किसिंग रुल; 'या' अभिनेत्यासोबत केलं लीपलॉक

तब्बल 29 वर्षानंतर काजोलने मोडला नो किसिंग रुल; 'या' अभिनेत्यासोबत केलं लीपलॉक

googlenewsNext

काजोल सध्या तिच्या 'द ट्रायल' या वेब सीरिजला रिलीज झाली आहे. दरम्यान, आता काजोल चर्चेत येण्याचं कारण तिनं या सीरिजसाठी तिच्या करिअरमधला नो-किसिंग पॉलिसी मोडली आहे. 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये काजोल ही एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच वेब सीरिजसाठी काजोलनं तिच्या करिअरमधील नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. यापूर्वी अभिनेत्री ऑनस्क्रीन किस करणं टाळायची.


काजोलने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बोल्ड भूमिकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण ओटीटीवर ती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. 'लस्ट स्टोरी 2'मध्ये काजोल तिच्या बोल्ड भूमिकेमुळे चर्चेत होती. आता तिनं किसिंग सीन दिला आहे. तिचा हा वेगळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. काजोलनं या सीरिजमध्ये दोनवेळा किसिंग सीन दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान ज्यानं तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर दुसरा अभिनेता जीशू सेनगुप्ता आहे. त्यानं काजोलच्या पतीची भूमिका साकारली आहे.

वयापूर्वी अभिनेत्री ऑनस्क्रीन किस करणं टाळायची. काजोलने अभिनेता अली खानला किस केले आहे. अली खान यांनी याबाबत चर्चा केली आहे. किसिंग सीनदरम्यान सेटवर कोणताही संकोच किंवा लाज वाटली नाही असं तिनं म्हटलं आहे.

वेब सीरिजमध्ये अली खान आणि काजोलची व्यक्तिरेखा कॉलेजच्या दिवसांमध्ये एकमेकांना डेट करत असत पण नंतर त्यांनी दुसऱ्यासोबत लग्न केले. काही कारणाने तिचा नवरा कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकतो. यानंतर अली खान काजोलच्या आयुष्यात परत येतो. द ट्रायल ही ‘द गुड वाईफ’ शोचा रिमेक आहे. मूळ शोमध्ये ज्युलियाना मार्गुइल्स मुख्य भूमिकेत होती. तर आता हिंदी व्हर्जन नुकताच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल, जीशू सेनगुप्ता, ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान, कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, गौरव पांडे आणि आमिर अली हे कलाकार आहेत.
 

Web Title: kajol kissed alyy khan on screen for the first time in debut web series the trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल