एकमागोमाग फ्लॉप चित्रपट पण वडिलांच्या लोकप्रियतेमुळे मिळतंय काम? आमिरचा लेक जुनैद खानने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:09 IST2026-05-14T16:06:54+5:302026-05-14T16:09:50+5:30
वडिलांच्या लोकप्रियतेमुळे फायदा झाला की तोटा? आमिरचा लेक जुनैद खानचं वक्तव्य चर्चेत, नेपोटिझमबद्दल म्हणाला...

एकमागोमाग फ्लॉप चित्रपट पण वडिलांच्या लोकप्रियतेमुळे मिळतंय काम? आमिरचा लेक जुनैद खानने स्पष्टच सांगितलं
Junaid Khan: बॉलिवूडमधील नेपोकिड्स हे कायम चर्चेचा विषय ठरतात. गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी मनोरंजनविश्वात पाऊल टाकलं आहे. त्यात काहींना यश मिळालं तर काहींच्या पदरी निराशा आली. या स्टारकिड्सना आई-वडिलांमुळे चित्रपटांमध्ये काम दिलं जातं, अनेकांना वाटतं. यावर आता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने प्रतिक्रिया दिली आहे.
जुनैद खान सध्या एक दिन चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तसंच त्याची मुख्य भूमिका असलेला लव्हयापा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर आपटला.असं असूनही त्याच्याकडे सिनेमांची रांग आहे. याबद्दल विकी लालवानी ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता स्पष्टचा बोलला आहे. जुनैद म्हणाला,"स्टार किड्सना संधी पटकन मिळतात कारण लोक त्यांना आधीच ओळखत असतात, ज्यामुळे निर्मात्यांसाठी त्यांचं मार्केटिंग करणं सोपं होतं.त्यामुळे एखाद्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता सर्वोत्तम आहे यापेक्षा कोणत्या अभिनेत्याची मार्केटिंग सहजपणे होऊ शकते हे पाहिलं जातं."
नेपोटिझमवर जुनैद काय म्हणाला?
मग पुढे मुलाखतीत त्याला आमिर खानचा मुलगा असल्याचा फायदा झाला का? असा प्रश्न विचारला गेला. तसेच नेपोटिझमबद्दलही विचारण्यात आलं.त्यावर बोलताना जुनैद म्हणाला," नेपोटिझम या शब्दाचा मला त्रास होत नाही, कारण ते खरं आहे. मी आमिर खान यांचा मुलगा असल्यामुळे मला बरंच काम मिळालं आहे." जुनैदचं वक्तव्य आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'एक दिन'अपयशाबद्दल बोलताना जुनैद खान म्हणाला, "आम्हाला चित्रपटाबद्दल अपेक्षा होत्या.पण चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही. हा एक असा चित्रपट आहे जो मला खूप आवडला. आणि काही लोकांनी चित्रपटाचं कौतुकही केलं. पण त्यात असेही लोक होते ज्यांना कथानक आवडलं नाही. कधीकधी असं होत असतं."