Throwback : डॅनीच्या घरची ती पार्टी, छोटीशी तब्बू आणि बहीण फराहचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:01 PM2023-03-05T15:01:30+5:302023-03-05T15:04:51+5:30

Tabu : तब्बूचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. तिच्या आयुष्यातील एका घटनेचीही बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. तब्बू यावर कधीच बोलली नाही. कदाचित तब्बू यावर बोलली असती तर एका अभिनेत्याचे करिअर उद्धवस्त झालं असतं...

jackie shroff was accused of bad behaviour by farah naaz younger sister tabu filmy | Throwback : डॅनीच्या घरची ती पार्टी, छोटीशी तब्बू आणि बहीण फराहचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं होतं?

Throwback : डॅनीच्या घरची ती पार्टी, छोटीशी तब्बू आणि बहीण फराहचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं होतं?

googlenewsNext

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तब्बू (Tabu ) वयाच्या उण्यापुऱ्या 15 व्या वर्षी तब्बू इंडस्ट्रीत आली आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.  1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम नौजवान’ या सिनेमात तिने देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तब्बूने अनेक हिट चित्रपट दिलेत. तिचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. तिच्या आयुष्यातील एका घटनेचीही बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. तब्बू यावर कधीच बोलली नाही. कदाचित तब्बू यावर बोलली असती तर एका अभिनेत्याचे करिअर उद्धवस्त झालं असतं. तो अभिनेता कोण तर जॅकी श्रॉफ.

तब्बूने आपल्या इतक्या वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये जवळपास सर्व मोठ्या हिरोसोबत काम केलं. पण जॅकी श्रॉफसोबत (Jackie Shroff) ती एकाही चित्रपटात झळकली नाही. यामागे एक कारण होतं.  तब्बू  त्यावर मौन बाळगणं पसंत केलं. पण तब्बूची मोठी बहिण फराह नाज (Farah Naaz ) हिने याबाबत खळबळजनक खुलासा केला होता.

काय होता तो किस्सा...
1986 मध्ये फराह आणि जॅकी श्रॉफ ‘दिलजला’ फिल्मचे शूटिंग करत होते. त्याकाळात तब्बू नेहमी आपल्या बहिणीसोबत सेटवर जात होती. या फिल्म मध्ये डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होता. शूटिंग संपल्यानंतर सगळी स्टारकास्ट डॅनीच्या घरी पार्टी करायचे. एकदिवस फराह तब्बूसोबत या पार्टीला गेली. जॅकीही या पार्टीत होता. पण जॅकीने एवढी दारू प्यायली होती, की तो तब्बूसोबत बळजबरी करायला लागला.

फराहने एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. ‘डॅनी तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचच ठरवलं होतं,’ असे फराह म्हणाली होती. तब्बूने आजपर्यंत कधीही या घटनेचा उल्लेख केलेला नाही. ही घटना घडली तेव्हा तब्बू तेव्हा 14- 15 वर्षांची असावी. हेच कारण आहे की, आपल्या अख्ख्या करिअरमध्ये तब्बूने बहुतेक सर्वच अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र आजपर्यंत तिने आतापर्यंत जॅकी श्रॉफसोबत काम केलेलं नाही. 
 

Web Title: jackie shroff was accused of bad behaviour by farah naaz younger sister tabu filmy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.