नीना गुप्ता ६६व्या वर्षी आहेत प्रेग्नंट? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये दिसला बेबी बंप, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 22:30 IST2026-03-12T22:30:05+5:302026-03-12T22:30:52+5:30

Neena Gupta News: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता ह्या वयाच्या ६६ व्या वर्षी प्रेग्नंट असल्याची खमंग चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होती. ही चर्चा नीना गुप्ता यांच्यापर्यंतही पोहोचली. त्यावर त्यांनी गमतीदार प्रतिक्रिया देत ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. तसेच आपण प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट केले.

Is Neena Gupta pregnant at 66? Baby bump seen at Vijay-Rashmika's reception, she said... | नीना गुप्ता ६६व्या वर्षी आहेत प्रेग्नंट? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये दिसला बेबी बंप, म्हणाल्या...

नीना गुप्ता ६६व्या वर्षी आहेत प्रेग्नंट? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये दिसला बेबी बंप, म्हणाल्या...

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता ह्या वयाच्या ६६ व्या वर्षी प्रेग्नंट असल्याची खमंग चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होती. नीना गुप्ता यांचा साडीमधील एक फोटो पाहिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. ही बाब एवढ्यावरच थांबली नाही तर ही चर्चा नीना गुप्ता यांच्यापर्यंतही पोहोचली. त्यावर त्यांनी गमतीदार प्रतिक्रिया देत ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. तसेच आपण प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट केले.

नीना गुप्ता ह्या हैदराबादमध्ये झालेल्या विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामधील त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता नीना गुप्ता यांनी याबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी वयाच्या ६६ व्या वर्षी मुलाची अपेक्षा करत नाही. आता एवढंच शिल्लक होतं. माझ्या खऱ्या जीवनाच्या शुभेच्छा, असं बॉलिवूड हंगामाशी बोलताना त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, माझ्याकडे कुठलीही गुड न्यूज नाही आहे. मी प्रेग्नंट नाही आहे. खरी गोष्ट म्हणजे मी त्या कार्यक्रमामध्ये जी साडी नेसले होते तिचं कापड थोडं जाड होतं. त्यामुळे मी थोडी जाड दिसत होते. पण या वयातही लोक माझ्या प्रेग्नंसीच्या चर्चा करतात, हे ऐकून बरं वाटलं. यावरून आपला समाज आता बदलत आहे, असं वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Web Title : क्या 66 साल की नीना गुप्ता हैं प्रेग्नेंट? अभिनेत्री ने दी सफाई

Web Summary : नीना गुप्ता, 66, ने रिसेप्शन की तस्वीरों के बाद अपनी गर्भावस्था की अफवाहों को संबोधित किया। उन्होंने स्पष्ट किया कि वह गर्भवती नहीं हैं, अटकलों का कारण अपनी साड़ी के कपड़े को बताया और बदलते सामाजिक दृष्टिकोण का स्वागत किया।

Web Title : Neena Gupta Pregnant at 66? Actress Clarifies Baby Bump Rumors

Web Summary : Neena Gupta, 66, addressed rumors of her pregnancy after photos from a reception circulated online. She clarified she isn't pregnant, attributing the speculation to the fabric of her saree and humorously welcomed the changing societal perspectives.