इरफान खानच्या हरवलेल्या टेप्स सापडल्या आणि बनली एक खास डॉक्यूमेंट्री; कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:32 IST2026-04-29T11:29:56+5:302026-04-29T11:32:57+5:30

इरफानच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

Irrfan Khan Documentary Paan Singh Tomar Bts Unseen Footage Marathi News | इरफान खानच्या हरवलेल्या टेप्स सापडल्या आणि बनली एक खास डॉक्यूमेंट्री; कुठे पाहता येणार?

इरफान खानच्या हरवलेल्या टेप्स सापडल्या आणि बनली एक खास डॉक्यूमेंट्री; कुठे पाहता येणार?

अभिनेता इरफान खान हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा हा अभिनेता आपल्यात नाही. इरफान खानचं २९ एप्रिल, २०२० ला निधन झालं. आज इराफान खानचा स्मृतिदिन आहे. यातच इरफानच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

इरफानच्या 'पान सिंग तोमर' या चित्रपटातील १४ वर्षे जुन्या आणि कधीही न पाहिलेल्या फुटेजवर आधारित 'A Story That Refused to Die' ही डॉक्यूमेंट्री प्रदर्शित झाली आहे. दिग्दर्शिका रंजीता कौर यांनी ही डॉक्यूमेंट्री तयार केली असून, आज (२९ एप्रिल) मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (NMACC) याचे विशेष प्रदर्शन पार पडत आहे.

या डॉक्यूमेंट्रीची निर्मिती अतिशय नाट्यमयरीत्या झाली आहे. रंजीता कौर सांगतात की, "मी 'पान सिंह तोमर'च्या शूटिंगदरम्यान बिहाइंड-द-सीन (BTS) शूट केलं होतं. २००९ मध्ये शूटिंग पूर्ण झालं आणि आम्ही चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत होतो. २०१२ मध्ये चित्रपट रिलीज होणार असल्याचा फोन आला. त्यावेळी मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने टेप्स पाठवून दिल्या. मात्र नंतर त्या टेप्स खराब झाल्या होत्या. काही महिन्यांनी मला एका हार्ड ड्राइव्हमध्ये तेच फुटेज पुन्हा मिळालं. तेव्हा मला वाटलं की या अनुभवावर आधारित डॉक्युमेंट्री बनवायलाच हवी". 

डॉक्यूमेंट्री कुठे पाहता येणार?

इरफानची पत्नी सुतापा यांनी हा डॉक्यूमेंट्री आधीच पाहिली आहे, तर त्यांचे मुले बाबिल आणि अयान यांनी आज पहिल्यांदाच वडिलांच्या या आठवणी पडद्यावर पाहिल्या. सुरुवातीला ही डॉक्यूमेंट्री विविध चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला जाईल.  त्यानंतर ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल, जेणेकरून जगभरातील इरफानचे चाहते तो पाहू शकतील.


 

Web Title : इरफ़ान खान के खोए हुए टेप मिले, वृत्तचित्र बना: कहां देखें?

Web Summary : इरफ़ान खान की 'पान सिंह तोमर' की शूटिंग के खोए हुए टेपों से 'ए स्टोरी दैट रिफ्यूज्ड टू डाई' वृत्तचित्र बना। एनएमएसीसी में प्रीमियर, बाद में ओटीटी प्लेटफार्मों पर स्ट्रीम होगा। दिवंगत अभिनेता की विरासत को श्रद्धांजलि।

Web Title : Irfan Khan's Lost Tapes Found, Documentary Made: Where to Watch?

Web Summary : Lost tapes from Irfan Khan's 'Pan Singh Tomar' shooting led to 'A Story That Refused to Die' documentary. Premiering at NMACC, it will later stream on OTT platforms. A tribute to the late actor's legacy.