आयपीएल 2018मध्ये ऋतिक रोशनसोबत स्टेजवर थिरकरणार 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 15:44 IST2018-04-06T10:14:30+5:302018-04-06T15:44:30+5:30

आयपीएल 2018 ला शनिवारी सुरुवात होणार आहे. याआधी ओपनिंग सेरेमनीची तयारी जोरात चालू आहे. यावर्षी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक ...

In the IPL 2018, Thiranarar '' actress, on stage with Hrithik Roshan | आयपीएल 2018मध्ये ऋतिक रोशनसोबत स्टेजवर थिरकरणार 'ही' अभिनेत्री

आयपीएल 2018मध्ये ऋतिक रोशनसोबत स्टेजवर थिरकरणार 'ही' अभिनेत्री

पीएल 2018 ला शनिवारी सुरुवात होणार आहे. याआधी ओपनिंग सेरेमनीची तयारी जोरात चालू आहे. यावर्षी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक सेलिब्रेटी परफॉर्म करणार आहे. यात वरूण धवन, ऋतिक रोशन, परिणीती चोप्रा यांची नाव सामिल आहेत. याशिवाय सुद्धा आणखीन एक अभिनेत्री याठिकाणी परफॉर्म करणार आहे. पहिल्यांदा तमना भाटिया आयपीएलचा हिस्सा बनली आहे. आयपीएलची ओपनिंग याआधी रणवीर सिंग करणार होता मात्र फुलबॉल खेळताना त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने परफॉर्म करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याच्या जागी आयोजकांनी ऋतिक रोशनची निवड केली. या सोहळ्याचे नृत्यदिग्दर्शन आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक शामक दावर करणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे त्यांच्या उत्तम नृत्यशैली आणि नृत्यसंदर्भातील अनोख्या प्रयोगासाठी ओळखले जातात. शामक आणि हृतिक या दोघांनी याआधी धूम २ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलेले आहे. तसेच अनेक अवार्ड्स शो मध्येही दोघांनी एकत्रितपणे काम केले आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावरने पुन्हा एकदा हृतिकसोबत काम करत असल्याची बातमी त्याच्या सोशल मीडियावरून नुकतीच दिली आहे आणि म्हणूनच यावर्षी हृतिक आणि शामक हे दोघे एकत्र येणार ही बातमीच आपल्याला एका शानदार सोहळ्याची चाहुल देणारी वाटते.

गतवर्षी दिशा पटानी, टायगर श्रॉफ, हर्षदीप कौर, रितेश देशमुख सारख्या अनेक सिनेकलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याला चार चांद लावले होते. दरवर्षी या उद्घाटन सोहळ्यात एखादा परफॉर्मन्स दिला जातो, ज्यात अनेक कलाकार मंडळी थिरकतात. यावर्षीही या सोहळ्यात कोणते कलाकार हजेरी लावणार आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार आहे. यानंतर मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंगमध्ये होणार आहे.  

Web Title: In the IPL 2018, Thiranarar '' actress, on stage with Hrithik Roshan