Video: क्या खूब लगती हो! ड्रीम गर्लसोबत रेखा यांनी धरला ताल, दोन दिग्गज अभिनेत्रींचा सुंदर बाँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:04 IST2023-10-17T11:03:16+5:302023-10-17T11:04:43+5:30

रेखा आणि हेमा मालिनी या ७० ते ८० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री.

Hema Malini turned 75 threw grand party for bollywood actors rekha and dream girl s video viral | Video: क्या खूब लगती हो! ड्रीम गर्लसोबत रेखा यांनी धरला ताल, दोन दिग्गज अभिनेत्रींचा सुंदर बाँड

Video: क्या खूब लगती हो! ड्रीम गर्लसोबत रेखा यांनी धरला ताल, दोन दिग्गज अभिनेत्रींचा सुंदर बाँड

बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) काल ७५ वर्षांच्या झाल्या. यानिमित्त ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले. जया बच्च, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला, राणी मुखर्जी सह अनेक तारे तारकांनी पार्टीची शोभा वाढवली. यावेळी रेखा (Rekha) आणि बर्थडे गर्ल हेमा मालिनी यांचा खास बाँड बघायला मिळाला. हेमा मालिनी यांच्या सुपरहिट 'क्या खूब लगती हो' गाण्यावर दोघींनी ठेका धरला.

रेखा आणि हेमा मालिनी या ७० ते ८० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री. तेव्हा त्यांच्यात चांगलीच स्पर्धा होती. मात्र त्याच्यात मैत्रीचं नातंही आहे याची झलक काल पुन्हा एकदा बघायला मिळाली. हेमा मालिनी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्टीत रेखा यांनीही हजेरी लावली. यावेळी पार्टीत डान्स, गाणी असा सगळा माहोल तयार झाला होता. रेखा यांनी स्टेजवर येत बर्थडे गर्ल हेमा मालिनींच्या सौंदर्याची गाण्यातून तारीफ केली. स्टेजवर असणाऱ्या गायिकेने लोकप्रिय 'क्या खूब लगती हो' हे गाणं गायलं तर रेखा यांनी हेमा मालिनींवर प्रेमाचा वर्षाव केला. गाण्यावर लिपसिंक करत त्यांनी हेमा मालिनींना मिठी मारली. त्यांच्या सौंदर्याची तारीफही केली. या दोन दिग्गज अभिनेत्रींना असं स्टेजवर बघून सर्वांनाच आनंद झाला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नुकतंच १० ऑक्टोबरला रेखा यांच्या वाढदिवशी हेमा मालिनी यांनी 'खास मैत्रिण' म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. हेमा मालिनी रेखा यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या आहेत. मात्र त्यांच्यातील मैत्रीचं नातं खूपच खास आहे. 

हेमा मालिनींच्या पार्टीत धर्मेंद्र हे देखील होते. तर त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहानाही सहभागी झाल्या होत्या. धर्मेंद्र यांनी पापाराझींसमोर येणं टाळलं मात्र पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघंही मात्र पार्टीत गैरहजर होते. 

Web Title: Hema Malini turned 75 threw grand party for bollywood actors rekha and dream girl s video viral