भूमिकेसाठी त्यानं स्वतःला कोंडलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 16:01 IST2016-05-10T10:31:39+5:302016-05-10T16:01:39+5:30

आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकार वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र एखाद्या कलाकाराला ती भूमिका मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते.. ...

He stole himself for the role! | भूमिकेसाठी त्यानं स्वतःला कोंडलं !

भूमिकेसाठी त्यानं स्वतःला कोंडलं !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: Mangal, serif; font-size: 16px; line-height: 18.4px;">आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकार वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र एखाद्या कलाकाराला ती भूमिका मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते.. हिंदीत म्हणतात तसं बहुत पापड बेलने पडते है.. असं काहीसं घडलं आहे अभिनेता विकी कौशलबाबत.. अनुराग कश्यपच्या रामन राघव 2.0 या सिनेमात विकी भूमिका साकारतोय.

अनुरागला याआधी दिग्दर्शनात असिस्ट करणा-या विकीला ही भूमिका तितक्या सहजासहजी मिळाली नाही. हा सिनेमा 1960 च्या दशकात मुंबईत दहशत माजवणा-या सायको-किलरवर आधारित आहे. यातील सायको-किलर नवाजुद्दीन सिददीकी साकारतो आहे. तर पोलिसाची भूमिका विकी कौशल साकारतोय.

मात्र हा पोलीस थोडा वेगळा आहे. तो त्रस्त आहे, वैतागलेला आहे.. कुण्या साध्या पोलिसासारखा नाही.. त्यामुळं ही भूमिका मिळवण्यासाठी अनुरागनं विकीची ऑडिशन घेतली.. त्या ऑडिशनपूर्वी त्या भूमिकेत शिरण्यासाठी विकीनं स्वतःला 5 दिवस एका बंद खोलीत कोंडून घेतलं. घरातल्या कुणाशीही संपर्क ठेवला नाही.. फोन, टीव्ही, वायफाय सगळ्यापासून स्वतःला त्यानं दूर केलं. सुरुवातीला त्याचा त्रास झाला. मात्र 5 दिवसानंतर त्या भूमिकेसाठी आवश्यक त्या गोष्टी आपोआप आल्या, ऑडिशन दिली आणि भूमिका पदरात पडल्याचं विकीनं म्हटलं.

Web Title: He stole himself for the role!